तुला म्हणून सांगते ....कोणाला सांगू नको हां..ह्या वाक्यापासून चालू झालेला लहानपणीचा संवाद ... आणि नंतर प्रत्येकवेळी ते सांगणे पुढे सरकवतांना तुला म्हणून...ची झालेली पुनरावृत्ती😇 साधं वाक्य पण त्याच महत्व खरच कळून येत जेंव्हा हे वाक्य महाग होते ,,,आणि म्हणणारं कोणी इतकं जवळ राहत नाही की, अगदी गळ्यात गळे घालून , डावी उजवी पावले तालात एकसारखी टाकून घर ते शाळा आणि परत घर अस करत रस्ताभर हसू सांडत जावं, घरात खूप गप्पा रंगल्यावर घरी जायची वेळ झाली म्हणून सोडायला फाटकापर्यन्त जावे...आणि पुन्हा गप्पांचं मोहोळ उठावे... खूप वेळ उभं राहून पाय दुखतायेत नाही का ग,,,च ल अंगणात बसुया...असे म्हणता यावं...
लग्न- संसार ह्यात ओघानेच अडकत नाही म्हणता येणार पण गुंतत जावं आणि कधीतरी काहीतरी सांगण्याची तीव्र इच्छा व्हावी आणि ते सांगण्यासाठी ना आधीसारखा दोघींना वेळ , माहेरच अंगण ,आणि मोकळेपणा असावा ...तिथेच सांगण थांबत राहत .....
मला जेंव्हा हे जाणवलं ..तेंव्हा कदाचित लिहिण्याची सोबत झाली ..खरतर बायकांच्या किंवा मुलींच्या एकमेकींना "तुला म्हणून सांगते कोणाला सांगू नको " ह्या वाक्यावरून खूप विनोद होतात ... पण मला आवडतं अस सांगणे ,ऐकणे ,पोचवणं, कळणं .. संपर्काची सगळी साधन आहेत कमी पडतंय ते वेळ असणं... म्हणून तर हा लेखनप्रपंच...
मला वाटतं ,जाणवतं ते मी लिहीत जाते ..अगदी साधंच...पण तिथे मी सांगू शकते ..पोचतही असावं खूप जणांचं असे म्हणणे असत की लेखन हे एकांगी असत...त्यात लगेचच प्रतिक्रिया अनुभवता येत नाही..असेलही...पण हे असं न सांगून निदान माझ्यापुरते तरी तुला म्हणून सांगते ...हे वाटणे हरवून का बसू??
पण काल मला अगदी आधीसारखा "फील" आला जेंव्हा माझीच पोस्ट शेअर केली गेली माझ्याच मैत्रिणींकडून....आणि त्यावर अभिप्राय ...अश्याच प्रकारचं दुसऱ्याचे सांगणे पोचू लागलं...
आणि माझं, तुला म्हणून सांगते ...कोणाला...😂 हे असे सांगणे फिरून माझ्यापर्यंत आलं ...
मैत्रिणींनो..खूप गुदगुल्या झाल्या बरं का मनाला ...मला बाई जाम आवडलं ... आणि म्हणावसं वाटतय.......
पण हो ........😊....हो ना ...हं मला वाटलंच...तुला आवडेलच ...हं ...हं.. हो ना...,🤗....😇....🙆...अगगबाई...हम्मम्म्म...चला बोलू उद्या...
ए ... पण तुला म्हणून सांगितलं हं ...सांगू नकोस कोणाला......😂😂😂😂😂😂
ऋचा प्रभुणे

Comments
Post a Comment