Posts

अश्वत्थ

 गाभाऱ्यात नंदादीप.…दीपमाळ प्रांगणात  तेज-प्रकाश सोहळा...भेद फकत बहिरंगात। आत उजळे त्रिपुर....नाश त्रिविध तापाचा। मांगल्याचे ते वलय....वेढा सुटे संशयाचा। द्वैताद्वैताचा कल्लोळ....विरे कापरासारखा। जीव-शिवाला भेटता..राहे प्राण का पारखा?  आता शाश्वत अश्वत्थ....दीप्ती सहस्ररश्मीची।  शुभ्र तेजाने झरते...आभा दृढ स्थिरतेची।। आरती जोशी-ऋचा प्रभुणे    

स्मरणी

स्मरणी म्हणे  नाम घेतले,जे मणी स्पर्शोन पुढे गेले । विसर्जो म्हणू अधिक झाले"मी"पण, नाम न स्पर्शिल्याने।। आरंभ-अंताचे  व्यवधान,आवर्तनांचीही ठेविता जाण ।  तरी,मग कैसे  हरवेल भान, व्यवहारे सर्व व्यापता असे ।। ज्याचे स्वरूप न ये मापता,ऐसा चिदानंद शोधो जाता । संचयाची कास नको आता,  अमेय तीच अनुभूती जाण ।। स्मरणीइतुके मूक  नाही,नाही स्मरणीसम  बोलके काही । आत्मसुखाची हीच ग्वाही,अंतःकरण "नाम" जपो आता।। आरती जोशी-ऋचा प्रभुणे

फुगे

 बघ ना परत एकदा... हे इतकं सहज जमतंय का..  क्षणभर का असेना,, सगळं साधं-सोप्पं  राहतंय का...  ह्या,फुग्यांइतकं हलकं...मन तरंगतंय का कधी  आता.. इतकंही रंगीत काही वाटतंय?? ..थोडंसं निसटून जाता... सोडून द्यावे विचार,,,एकदाच्या झटकून टाकाव्या चिंता ओझं नको ,  खंत नको,, जरा  तसाच राहू दे ना गुंता.. कुठे कसलेच आयाम नकोत आता मनमोकळं हसताना एक फुंकर एक झुळूक,बघ दिसतं का सगळं विरताना.. आरती जोशी-ऋचा प्रभुणे.

चन्द्र_आहे_साक्षीला

 #चन्द्र_आहे_साक्षीला शरद रावांचं सहस्त्रचन्द्र दर्शन करण्याचा ठराव कुटुंबात अर्थातच, एकमताने झाला,, तेंव्हाच शरद रावांनी अट घातली,हा  कार्यक्रम आप्तेष्टांच्या सहवासात,, छोटेखानीच करायचा....मुहूर्त ही त्यांनीच ठरवला,, शुभवेळ बघण्याची गरजच नव्हती... कोजागिरी पौर्णिमा.. संध्याकाळी ,, गच्चीत,, गप्पागोष्टींच्या साथीत अनौपचारिक सोहळा. ठरलं...अगदी नक्की.. असंच होणार...  शरद रावांच्या मनासारखं... उत्साहाच्या, ठरवाठरवी च्या  लाटेवर स्वार दिवस,, झुळके सरशी निघून गेले,,, आणि तो दिवस उजाडला.. शरदराव अगदी वाट बघत होते,,, दिवसापेक्षा,, संध्याकाळची,, आणि त्यामागोमाग येणाऱ्या  पौर्णिमेची...पूर्ण चंद्राची रात्र.. त्या दिवशी ते सतत कपाटाजवळ जाऊन चाचपणी करत असल्याचं श्यामल ताईंच्या नजरेतून निसटलं नव्हतं... काय  चाललंय??ह्या भुवयांनी विचारलेल्या प्रश्नाला,, कुठे काय??काहीच नाही,, हे उत्तर डोळे मिचकावून मिळालं होतं.. आणि ती वेळ आलीच,,,  मुलं-बाळं ,, नातवंड-पतवंड  बहिणी, जावई, साडु-मेव्हणे ह्यांनी  भरलेलं घर,,,,आणि,,, शरदरावांनी श्यामल ताईंना हाक मारली,, अहो,, मं...

नांव

 अलक- #नांव  एकत्र राहता,, म्हणजे  काही आमच्या प्रेमासाठी नाही!!! ह्याला बाहेर  नोकरी कुठे मिळणारे....झेपायला तर हवं.. ते होणार नाही हे माहितीय तुम्हालाही,,,,म्हणून राहताय एकत्र...हे ऐकलं आणि..... "त्याच्या-तिच्या" डोळ्यात पाणी तरळलं,, त्यांच्या  आपलेपणाचा असा हिशोब मांडला गेल्यावर...  घरातून बाहेर पडताना,, करून दाखवेन नाहीतर,, "नांव" नाही लावणार... असं म्हणून डोळ्यातलं पाणी खसखसून पुसलं होतं त्याने,,,  आज,,, स्वतःच्या घराच्या दारावर  सम्पूर्ण नावाची पाटी लावताना,, परत एकदा  पाणी तरळलं..त्याने परत एकदा पुसलं... आणि तिने मात्र वाहू दिलं..ओसंडून वाहणं गरजेचंच होतं. दळणाच्या डब्यापासून,, ते  नैवेद्याच्या घसघशीत चांदीच्या वाटीपर्यंत,, "त्याचं" नाव कोरून घेण्याचा हा, आठवणींचा "प्रवास" असाच पुसणं तिला चालणार नव्हतं😊 आरती जोशी-ऋचा प्रभुणे फोटो सौजन्य: साभार गुगल

सडा

 सडा कालचा आठवे जुई हसे वेलीवर... भरे ओंजळ तरीही सांडू  जाते  भुईवर... क्षण आजचा देखणा परी..विसरू कसे ते... मातीशीच जुळणारे माझे  कायमचे  नाते... मन  करी धडपड रेघ  कश्याची सांधाया... "आज" येई पकडीत लागे "काल" निसटाया...। श्वास भरुन घे गन्ध ठेव जपून आठव... जाता ओलांडून उरे मागे शाश्वत साकव... आरती जोशी-ऋचा प्रभुणे

मेतकूट

 #मेतकूट तन्वी आणि तेजसच्या लग्नाला , बघता बघता नऊ महिने झाले होते.छान, हसरी, छोटीशी  चण असलेली तन्वी..तिला साजेसा,, रुबाबदार, प्रेमळ,,,,उंचापुरा तेजस...जोडी बघताक्षणी,, कानशीलावर बोटं दुमडण्यासारखी. तन्वी चा ह्या घरातला पहिलाच गणपती. ह्यावेळच्या सणाच्या नवलाईला  आणखी एका नव्हाळीचं खास  तेज चेहऱ्यावर  ओसंडत होत. सगळं घर,, आता येणाऱ्याच्या प्रतीक्षेत होतं.. तेजसच्या आजी.."जिजी"..नेहमीपेक्षा वरचढ उत्साहात  होत्या.कारणच तसं होतं,,, तन्वीची नुकतीच चोरओटी भरली होती..येणाऱ्या गौरी -गणपती  बरोबरच पुढे काही महिन्यात होणाऱ्या ह्याही "विशेष" आगमनाची ओढ होती. अंजली ताई, अरविंदराव...जिजी,, तेजस  सगळं घर म्हणजे नुसता, आनंद, उत्साह, ह्यांचं वारेमाप उधाण झालं होतं.. तन्वी सग्गळ कौतुक करून घेत होती.. जपून,, जड उचलू नको, भरभर चालू नको, प्रसन्न राहायचं,, मनातलं बोलायचं,, जे हवं वाटेल ते सांगायचं,,, आणि हो...हरीविजयातला,, सत्ताविसावा अध्याय तेवढा वाच हो..वाचशील ना..??जिजीं नि होकार भरवून घेतला होता. गौरी गणपतीची तयारी आता पूर्ण झाली होती.तन्वी सगळी लगबग बघत होती.. स...