आज फादर्स डे .... बाबांसाठी.. बाबांबद्दल काय आणि कसे लिहावे... फारसे व्यक्त केलं जातं नाही ते यादिवशी सांगायची संधी आहे... बाबा म्हणलं की माझ्याच कुटुंबातले जवळून अनुभवता आलेले सगळेच बाबा लोक मला आठवतात .. माझे आजोबा, माझे बाबा आणि आता माझ्या लेकीचा अरे बाबा.. आज तुम्ही सगळे अवतीभोवती असल्याने मी भाग्यवान आहे हे शब्दही माझ्या मनातलं सगळ व्यक्त करायला पूरे पडणार नाहीयेत. माझे बाबा .. कर्तबगार,अत्यंत हुशार ,वाचनप्रिय,ओघवते वक्तृत्व, प्रामाणिकपणा,रुबाबदार व्यक्तिमत्व,अजून खूप काही ... आमच्याबरोबर बऱ्याच लोकांना माहीत असलेल्या ह्या बाजू ग्रेट आहेतच... पण माझ्यासाठी तरी ते घरात आल्यानंतर फकत आमचे बाबा म्हणून आमच्यासाठी असायचे तेच बाबा साहजिकच खूप जास्त जवळचे वाटतात. . ...बाबा,मी आणि माझी बहिण ...आजसारखं अगदी हायफाईव देण्याइतपत मोकळेपणा नव्हता ..पण कधीतरी गम्मत म्हणून आईला चिडवण्याच्या कटात सामील होण्याचा मिश्कीलपणा नक्कीच होता.आई तुला नाही आमची गम्मत सांगणार असे म्हणले तर...
Posts
Showing posts from February, 2019
- Get link
- X
- Other Apps
मन ...आजपर्यंत न कळलेली गोष्ट,खूप लिहिलं गेलंय,सांगितलं गेलंय, आपणही खूप वेळा अनुभवतो.... अनाकलनीय,अगम्य ,अथांग ....वगैरे मोठया मोठ्या शब्दांना पण अगदी साधे - सोपे सहज वाटणारे मन पूर्णतः व्यक्त करता आलं नाहिये... ह्यामध्ये वेगळं काहीच नाहीये पण त्याच्या अनुषंगाने दरवेळी येणाऱ्या वेगळ्या अनुभवाची मात्र गंमत वाटते....म्हणून आज हे लिहिण्याचा मोह आवरत नाही. निमित्त होतं अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीचं मंडळांनी केलेली भव्य आरास,ढोल ताशा पथक , रांगोळ्या सगळंच छान वाटणारं, नेत्रदीपकही...त्यात थोडा स्वतःचा ठसा असला तरी ते सगळं साजरं करण्याचा उत्साह ,आनंद,लगबग ह्या सगळ्यावर मोहोर होती ती मात्र लाडक्या बाप्पाची च..मंडळाचा लहानमोठेपणा ,मानपान ह्यावर उत्साहाची प्रतवारी ठरलेली नव्हती... तो सगळीकडे सारखा होता...त्यावेळी तिथे असणे ... नुसते असणे हे पण खूप छान वाटत होतं...त्याच उत्साहाचं लागिरं झाल्यासारखं....😊 ............मनात विचार आला इतर काहीवेळी माणूस आपण इतरांपेक्षा वेगळं दिसावे ,उठून दिसावे म्हणून किती धडपड,आटापिटा करत अस...
- Get link
- X
- Other Apps
संध्याकाळच्या रामरक्षा आणि शुभंकरोती चा नेम (आईसाठी का होईना)पार पाडल्यावर आमच्या बाळाबाई रिमोट घेऊन बटन दाबण्याच्या तयारीत असता...., चैत्रा ,,,लगेच टीव्ही ,, अग शुद्धलेखन वगैरे नाही का काही तुला ,असे म्हणून,तिच्यालेखी तिच्या बेताचा विचका केला आणि माझ्यालेखी अभ्यासासाठी मागे लागण्याचे खास आईचे आद्य कर्तव्य बजावले.सध्या तरी आईचे ऐकण्याच्या वयात असल्यामुळे बाईसाहेब लगेच कुरकुरत का होईना शुद्धलेखन लिहायला बसल्या🤓 आज मी मनानेच लिहिते असे "डिकलिअर"करून,म्हणजे आता तुझी लुडबुड नको असे सुचवून नाक उडवत लेकीबाई लिहायला बसल्या. १० मिनिटात माझ्यासमोर वही फडफडवत म्हणली बघ मी कसे लिहिलंय ....एवढ्या लवकर झालं पण म्हणून मी अगदी मनोमन खुश होऊन वही बघितली .... आणि,,, मुलांचे मानसशास्त्र , सुजाण पालकत्व, अभ्यासाचा ससेमिरा ,विभक्त कुटुंब पद्धतीत मुले आणि त्यांचे प्रश्न ...ही असली प्रश्नांची वावटळ जी सध्या माझ्या वयाच्या सर्व आयांमध्ये कमी अधिक प्रमाणात उठत असते, क्षणार्धात डोळ्यासमोरून भिरभिरून गेली आणि त्याला सहज छेद देऊन ती भिरकावून कशी देऊ ह्या...
- Get link
- X
- Other Apps
७ मार्च ...जागतिक महिला दिनाच्या एक दिवस आधी .. संध्याकाळी..व्हॉट्सएप, टीव्ही वर कविता , लेख, काही विनोदसुद्धा ह्यांचा खच एव्हाना पडायला लागला होता .. तीच संध्याकाळ .कामाची प्रचंड धांदल.. माझी मात्र धुसफूस ...असेना का उद्या जगासाठी महिला दिन वगैरे ...इथे येऊन बघा काम करावीच लागतायेत ... इतकंच काय उदयाची तयारी सुद्धा मेली आजच करावी लागतेय ...का तर जरा कमी धावावे लागेल ना उद्या ...सलग १० मिनिटे स्वस्थ बसावे तर जमतंय तरी का,ह्याचे काय घरातल ठराविक काम केलं की विचारायचं ...माझ्याकडे आता काही काम आहे का...म्हणजे मी करू मग माझी काम ....???धुसफूस ,तणतण करत माझी गाडी आता अहोंवर घसरु लागली होती ...( नेहमीप्रमाणे😋) चार ठरलेली घरातील काम केली की झाले .. आमचे तसे होते का ???घरातली काम करा ,बँक ,कलासेस,बाजार,सामान ,मुलीचा अभ्यास(हो मार्च महिन्यात हा विषय खास ऐरणीवर),....ह्यासारखे अनेक विचार आणि आणि मी ह्यापैकी कधीतरीच करते ती काम पण ह्या यादीत वाढत होती...नाहक चिडचिड झाली की नंतर विचार कोणते वळण घेतील हे मला तरी कुठे माहीत असत???🤔 .....
- Get link
- X
- Other Apps
तुला म्हणून सांगते ....कोणाला सांगू नको हां..ह्या वाक्यापासून चालू झालेला लहानपणीचा संवाद ... आणि नंतर प्रत्येकवेळी ते सांगणे पुढे सरकवतांना तुला म्हणून...ची झालेली पुनरावृत्ती😇 साधं वाक्य पण त्याच महत्व खरच कळून येत जेंव्हा हे वाक्य महाग होते ,,,आणि म्हणणारं कोणी इतकं जवळ राहत नाही की, अगदी गळ्यात गळे घालून , डावी उजवी पावले तालात एकसारखी टाकून घर ते शाळा आणि परत घर अस करत रस्ताभर हसू सांडत जावं, घरात खूप गप्पा रंगल्यावर घरी जायची वेळ झाली म्हणून सोडायला फाटकापर्यन्त जावे...आणि पुन्हा गप्पांचं मोहोळ उठावे... खूप वेळ उभं राहून पाय दुखतायेत नाही का ग,,,च ल अंगणात बसुया...असे म्हणता यावं... लग्न- संसार ह्यात ओघानेच अडकत नाही म्हणता येणार पण गुंतत जावं आणि कधीतरी काहीतरी सांगण्याची तीव्र इच्छा व्हावी आणि ते सांगण्यासाठी ना आधीसारखा दोघींना वेळ , माहेरच अंगण ,आणि मोकळेपणा असावा ...तिथेच सांगण थांबत राहत ..... मला जेंव्हा हे जाणवलं ..तेंव्हा कदाचित लिहिण्याची सोबत झाली ..खरतर बायकांच्या किंवा मुलींच्या एक...
- Get link
- X
- Other Apps
मुलीची वार्षिक परीक्षा संपत आली ,,आणि तिच्या आधी मे महिन्याच्या सुट्टीत मीच जाऊन पोचले ...लेकीची यादी तयार च होती...अगदी कागदावर लिहून वगैरे....माझी पण ...मनातल्या मनात...हे करू ,ते करू ...पण जशी ही परीक्षा संपण अगदीच जवळ आलं तेंव्हा कॅलेंडर जवळ बऱ्याचवेळ उभं राहून पानं उलटणे, तारखांवरून बोट फिरवून ,मनातच ठरलं!!!! असे म्हणून खुशीत मान डोलवण ... हे चालू झाल्यावर लग्गेच अहोंचा खास शैलीत प्रश्न आलाच...झाली का सुरू माहेरपणाची आखणी😂...बेत रचून झाला असेल तर घोषणा करून टाका सरकार.... काय तुला अगदी माहेरपण वगैरे लाड करून घ्यावेसे वाटतात गं??? मनासारखं इथेही सगळं होतं ,राणीचा रुबाब आहे, मानाचा आब आहे ,घराची सर्वेसर्वा तूच...मग अजून काय बाकी राहतं की माहेरपणाची बेगमी करून ठेवतेस😁... मी मनातच म्हणलं.... एका दिवसात ह्या घरातुन ..त्या घरात जी येते ना तेही ...आता कायमच हं .!! ह्या जाणिवेनं..तिलाच कळतं फकत..खूप कौतुकाने बॅगा भरलेल्या असतात , हव्या त्या गोष्टी कमी पडू नयेत म्हणून बरोबर दिलेल्या असतात ,...
- Get link
- X
- Other Apps
आज एक विषय असाच बोलता बोलता माझ्या समोर आला की ,आपण किंवा आधीच्या पिढ्यांनी ज्याप्रमाणे उन्हाळी सुट्टीचा आनंद घेतला त्याप्रमाणे आताची मूलं का घेऊ शकत नाहीत किंवा तो तसा घेता यावा ह्यासाठी काय करावे म्हणून थोडे लिहिण्याचा प्रयत्न करतेय... आपले मत जरूर सांगा... पहिला प्रश्न हा की मुलांना आपल्यासारखी सुट्टी मिळत नाही हा.... विस्तारलेला आवाका मग तो सगळ्याच गोष्टींचा असो स्पर्धा , ज्ञान, इतर कलागुण ,संधींची उपलब्धता त्यासाठी सर्वतोपरी किमान पात्र ठरण्याची धडपड ... त्यासाठी करावे लागणारे विशेष प्रयत्न, सिद्ध करण्यासाठी सामोरे जावे लागते अश्या अनेक पातळ्या ... आणि हे सगळे केले नाही तर सध्याच्या परिस्थितीत स्थिर आयुष्य जगण्यात येणाऱ्या अडचणी ... ह्यातला कुठलाच संदर्भ किमान १० वि पास होईपर्यत आपल्याला नव्हता जो ह्या मुलांना पहिली पासून हल्ली असतो असे म्हणले तरी चालेल .. कारणे काहीही असोत पण हा फरक खूप मोठा आहे . .....ज्याप्रमाणे आपले आजी आजोबा आणि आपली पिढी ह्यात त्यांना आणि आपल्याला जे फरक जाणवले तेच जरा जास्तच जलद आपल्...
- Get link
- X
- Other Apps
आज फादर्स डे .... बाबांसाठी.. बाबांबद्दल काय आणि कसे लिहावे... फारसे व्यक्त केलं जातं नाही ते यादिवशी सांगायची संधी आहे... बाबा म्हणलं की माझ्याच कुटुंबातले जवळून अनुभवता आलेले सगळेच बाबा लोक मला आठवतात .. माझे आजोबा, माझे बाबा आणि आता माझ्या लेकीचा अरे बाबा.. आज तुम्ही सगळे अवतीभोवती असल्याने मी भाग्यवान आहे हे शब्दही माझ्या मनातलं सगळ व्यक्त करायला पूरे पडणार नाहीयेत. माझे बाबा .. कर्तबगार,अत्यंत हुशार ,वाचनप्रिय,ओघवते वक्तृत्व, प्रामाणिकपणा,रुबाबदार व्यक्तिमत्व,अजून खूप काही ... आमच्याबरोबर बऱ्याच लोकांना माहीत असलेल्या ह्या बाजू ग्रेट आहेतच... पण माझ्यासाठी तरी ते घरात आल्यानंतर फकत आमचे बाबा म्हणून आमच्यासाठी असायचे तेच बाबा साहजिकच खूप जास्त जवळचे वाटतात. . ...बाबा,मी आणि माझी बहिण ...आजसारखं अगदी हायफाईव देण्याइतपत मोकळेपणा नव्हता ..पण कधीतरी गम्मत म्हणून आईला चिडवण्याच्या कटात सामील होण्याचा मिश्कीलपणा नक्कीच होता.आई तुला नाही आमची गम्मत सांगणार असे म्हणले तर...
- Get link
- X
- Other Apps
आज पितृदिन ...फादर्स डे.. आठवण तर रोजच असते😇 पण जसं जसं मोठे होऊ ....तसं तसं आठवणींमध्ये, अनुभवामध्ये अजून भर पडत जाते , आणि दरवेळी अधिकाधिक कळत जातो तो...बापमाणूस... तर अश्या बाबांना हे सगळं शब्दातून सांगण्याचा दिवस म्हणू हा .. मी फोटोज बघत होते ,, खूप जुना फोटो सापडला,, त्यांनी मला कडेवर घेतलेला...हातात कॅमेरा ..आणि लहानपणी केलेल्या उद्योगाची आठवण म्हणून तोंडावर अवेळीच केलेली रंगपंचमी😂 आणि सगळ्यात गमतीचा भाग म्हणजे बाबांचा हा दाढी शिवाय असलेला ,,, दुर्मिळ म्हणलं तरी चालेल असा फोटो...... तो बघत असतांनाच कन्यका आली ,, जवळजवळ माझ्या हातातून हिसकावून घेतलेला फोटो बघत म्हणाली... woowww आबा किती ...cute दिसतायेत😛...(डायलॉग पहिला),,, आई ही तू आहेस ??आणि, त्यावेळी तुला आबांनी कॅमेरा हातात दिलाय ..बघ बघ...आणि मी मात्र बाबाचा मोबाईल घेतला की डोळे मोठे करतेस(डायलॉग दुसरा..मी अडचणीत) आणि by the way... तू अहो बाबा का म्हणतेस ग...मी तर माझ्या बाबाला "अरे बाबा " च म्हणणार..तो खूप गोड आहे आणि आम्ही...
- Get link
- X
- Other Apps
प्लॅस्टिक बंदीचा निर्णय सध्या अगदी गाजतोय...नेमेची येतो मग... ह्या उक्तीप्रमाणे जोक्स, पोस्ट , वैचारिक चर्चा यांचा भरणा आहे ,,, पण ...आज परत ह्याच विषयावरून मला माझ्या आजीची आठवण होते , प्रत्येक लहानमोठ्या गोष्टीत अश्या पद्धतीने सर्वप्रथम कुटुंबाची आठवण होणं ...हे का???.. कुटुंबातील, मोठी माणसं एखादी गोष्ट बिंबवतात ती त्यांच्या वागण्यातून,,, संस्कार हे सांगून केले जात नाहीत , वागण्यातून होतात ,,, ह्याबाबतीत मी अतिशय श्रीमंत आहे असच म्हणावं लागेल कारण अश्या गोष्टी की ज्या आदर्श समजल्या जातात ,त्या माझ्या आजूबाजूची माणस सहज करतात...श्रेयवाद म्हणून नाही पण त्या बरोबर आहेत , आणि तश्याच राहणार आहेत..म्हणून... बदलाला विरोध नाही पण तो हितकर नसेल तर अवलंबायचा नाही ,,, साधी शिकवण ....... माझ्या घरात प्लॅस्टिक वापर हा खूप कमी , अगदी जेमतेम म्हणलं तरी चालेल इतकाच होता,,,अजिबात नाही असे जरी म्हणता येत नाही तरी, अनेक दैनंदिन गोष्टींसाठी , प्लॅस्टिक वापर शकय आणि आजुबाजूला रूढ असला तरी आमच्य...
- Get link
- X
- Other Apps
When u do things as Ur brain says, Ur heart will be deceived ...n when u go by Ur heart it may seems to be illogical .... But sometimes it's nice tobe illogical as it never immitates..... ......😊 ...अगदी सहज मनात विचार येतोय आणि लिहितेय ... Just going with my heart..;)... भावनिक निर्णयाच्या दिशेने जाऊ इच्छिणारी माणसे आणि फकत विचारांच्या दिशेने निर्णय घेण्याला प्राधान्य देणारी माणसे... यांच्याबद्दल... जेंव्हा तुम्ही फकत वैचारिक निर्णय घेता तेंव्हा कदाचित मनातला आवाज दाबून टाकता किंवा त्याला वेगळ्या वाटेवर नेऊन तेच बरोबरआहे ही समजूत करून घेता... आणि जेंव्हा भावनिक प्राधान्याने निर्णय घेता त्यावेळी ते तर्कशुन्य कधी कधी पूर्णतः असंबद्ध वाटतात पण कधी कधी असे होणंही चांगलं असते. कारण त्यात दिखावा नसेल. थोडक्यात जेंव्हा नक्की काय करायचंय कळत नाही तेंव्हा मनाने घेतलेले निर्णय receive होतात decieve नाही.... कितीतरी वेळा मनापासून जे वाटत असते अगदी त्याविरुद्ध वागतो आपण ... कधीतरी व्यवहार म्हणून...
- Get link
- X
- Other Apps
सध्या व्हॉट्सअप किंवा फेसबुकवर खूप चांगले लेख वाचनात येतात ..माझ्याही मनात हा विचार कित्ती वेळा येतो.. पूर्वी आणि आता ह्यामध्ये असलेला फरक... काही चांगल्या गोष्टी आपण अंगिकारल्या पण त्याचवेळी काही खूप चांगल्या गोष्टी दुरावत पण गेल्या.हा आज आणि पूर्वी मधला फरक पिढीगणिक सगळ्यांनाच जाणवतो..पण अश्यावेळी नवीन गोष्टींचे बोट पकडताना चांगले ते जपायचे,वाढवायचे ...आणि पुढच्या पिढीला त्याचा वारसा द्यायचा आणि अजून समृद्ध करायचे हे काम आई बाबा आज्जी आजोबा किंवा मोठी माणसे म्हणू ह्यांच्याकडून व्हायचं...आजचेही आईबाबा करतात..पण कधीतरी धावती जीवनशैली जी अतिसमृद्धीबरोबर नियमानेच आली आहे ..तिच्याबरोबर कसरत करत सगळे सांभाळताना वाटते की काहीवेळा हा वारसा द्यायला आपण कमी पडतो का..किंवा अगदी माझ्याच बाबतीत बोलायचे झाले तर असा काय आहे जे आजही सक्षमतेने मी जपून वाढवून माझ्या लेकीला पुढे देऊ करेन? ह्या बरेच दिवस घोळणाऱ्या आणि नंतर सोयीने बाजूला सारलेल्या प्रश्नाचे मला काल एकदम उत्तर सापडलं.. ...आईकडे गेले होते आणि माझे कपाट उघडले की जे अजूनही माझ्याआणि माझ्या बहिणीच्या वस्तू सांभाळून आहे..😊...निर...
- Get link
- X
- Other Apps
दिवस :आठवाड्यातला कोणताही वेळ :दिवसातली कोणतीही फोनची रिंग वाजते ... आई ... कॉलिंग... कित्तीही वर्ष झाली लग्नाला तरी हा फोन बघितला की हसू येतच मनात.फोन उचलते आई तिकडून विचारते,काय चाललंय ???झाल का सगळे आवरून , सुरुवात साधारण अश्याप्रकारे झाली की आई हळूच विचारते आहे ना वेळ?मी अगदी झोकात होहो म्हणले की आई सुखावते, धबधब्यासारखी सुरुवात करते .. अग काय परवा करते म्हणालीस फोन आणि नंतर फोनच नाही मी वाट पाहिली मग मला वाटलंच काहीतरी काम असेल.. म्हणून मी आज केला... मी नेहेमी सारख काय आणि कसे झाले ते सांगते...जरा जुजबी बोलणे होतं तेवढ्यात मोबाइल मधलाच अलार्म आठवण करून देतो की लेकीबाईंना शाळेतून आणायला निघण्यासाठी 10 च मिनिट राहिली आहेत ... आणि हळूच मधेच थांबवत मी आईला म्हणते ,आई मी तुला नंतर करु का मी तिला ना शाळेतून घेऊन येते हं....अच्छा........ ......... ....... .... हं बाय बाय...... हा फोन ठेवला जातो ते पुढच्या आठवड्यात परत आई कॉलिंग बघितल्यावरच उचलला जातो....😢 .................. तो किंवा तसाच एक दिवस ,संध्याकाळची...
- Get link
- X
- Other Apps
पोस्टमध्ये ,,सर्वप्रथम चित्रकविता: प्रिय वन्स अर्थात् ... दीपाली प्रभुणे कुलकर्णी 😊 कुणाची अंतरंगे कधी कुणा नाही उमगली अंतरी श्रीफलाच्याही जन्मली बाळे जुळी .......................... जन्मजन्मांतरीची साथ ही या जन्मातही ना सुटली करवंटीच्या कठोरतेतही मलईदार प्रीत बहरली ........................... आज सकाळी आईने एक नारळाचा फोटो पाठवला... जुळा नारळ,,, एका नारळात दोन...मी पहिल्यांदाच पाहिला,,, मजा वाटली ,,म्हणलं लेकीला दाखवू,,, ...ती शाळेतून आल्या आल्या तिला दाखवला,,, अय्या बघू बघू म्हणत तिनंही गमतीनं बघितला...हसली बाबा एकदाची ,,सकाळीच काही कारणावरून झालेली कट्टी संपली ...रूसारुशीचा अध्याय संक्षिप्त ठरला आणि थोडक्यात भागलं ,,म्हणून मी सुटले म्हणलं...चला एका दगडात दोन पक्षी.... ......... तेवढ्यात नणंदेचा मेसेज...अय्या खरंच असा आहे का???...आणि उत्तरानंतर अर्थातच पुढचा काही वेळ गप्पा ,, चॅटिंग ...खूप दिवसांच राहिलेलं बोलणं असा मजेत गेला ,,,, पटकन एक- दोन चित्र कविता अगदी सहज गम्मत म्हणून बोलता बोलता केल्या ...
- Get link
- X
- Other Apps
loveforsaree❤......... परवाच कधीतरी, समारंभाच्या निमित्ताने साडी नेसायची म्हणून कपाटासमोर उभी राहिले....ही नको , ती नको करत ..पोपटी- हिरव्या रंगावर नजर स्थिरावली...लग्नातली तेलफळाची साडी... आठवणींची ती साडी बाहेर काढली...आणि आरश्यात बघत असताना मागून लेकीबाईंचे अनुमोदन मिळाले ..आई तू हीच नेस आज.. मी अजूनही त्याच्या काठ पदरातच अडकून राहिले होते..परत परत बघताना आठवणींचे पदर उलगडत होते...कित्ती हौसेनं घेतली होती..सगळ्यांना आवडली ...आवडत्या माणसाला तर खूपच..माझा तर हिरवा रंग कित्ती आवडता... साडी ..वेगवेगळ्या कारणांनी ,वयाच्या वेगळ्या वेगळ्या टप्प्यांवर , वेगवेगळ्या निमित्ताने आपल्या जवळ येते आणि ... कित्ती खास होऊन मनात राहते.. ...अगदी पाळण्यात असताना माझ्या अंगावर पांघरलेली आजीच्या साडीची चौघडी .. त्यावेळी कळली असेल नसेल,, पण आज जाणवते मात्र नक्की..नंतर आत्यानी कौतुकाने घेतलेलं परकर- पोलकं असो किंवा,छोटीशी कल्पना साडी ...कित्ती हौसेने नेसवली गेली,,आज्जी किंवा आईची साडी.. भल्या मोठया निऱ्यांचा बोंगा सावरत जेंव्हा"आप्...
- Get link
- X
- Other Apps
कपाट आवरताना आज कितीतरी गोष्टी सापडल्या .... दरवेळी ह्या वस्तू असायच्याच गेली अनेक वर्षे ...पण गडबडीत आहेत तश्याच परत ठेऊन द्यायची ...😊आज मात्र एकेक वस्तू काढून बघितली ... आणि कुठून... कशी कधी मनाने फेरी मारली ...समजलं नाही ..मी अगदी रंगून गेले ... छोट्या बहिणीने दिलेलं ग्रीटिंग ,कधी तरी लिहिलेला निबंधाचा कागद,मोगलीची चित्रकलेची वही,शाळेतल्या गृहापाठाच्या वह्या, कवितेची पुस्तक,....अगदी प्रेमात पहिलं मिळालेलं गुलाबाचे फुल...जुन्या हिशोबाच्या वह्या( ह्या सवयीचे क्रेडिट आजोबांना) रंग ,कात्रण डायऱ्या, आज्जीने विणलेला स्कार्फ वेगवेगळ्या...कित्तीतरी गोष्टी.. सर्टिफिकेट, किंवा प्रगतीपुस्तक याव्यतिरिक्त अगदी साध्या...वाटणाऱ्या...चढत्या आलेखाचा ठसा नसेल त्यावर पण होत जाणाऱ्या बदलांचा मात्र नक्की आहे... ह्या वस्तू खूप जुन्या झाल्या आहेत,थोड्या फाटल्या पण आहेत ...म्हणावे तर विशेष काही नाही... आवराआवर करताना आवर पटापट..सदरातल्या... पण आज मात्र वाटलं की ह्या गोष्टी इतक्या जुन्या झाल्या आहेत ...ही पुस्तक वापरता वापरता ह्यात अन्नपूर्णा कधी सामील झालं.......
- Get link
- X
- Other Apps
कळावे असे ह्या जीवाचे जीवाला जसा दर्पणि चेहरा की पहावा। नसावा आता भार शब्दांवरीही आकांत अंतरीचा मुक्याने सहावा।। तुझ्या आठवांना कश्याचे दिलासे.. नेणीव होऊ पाहे सुखाचे कवडसे। करावा मोकळा श्वास वेढ्या सवेही निसटत्या क्षणांचे उमटू द्यावे ठसे।। व्यथा आसवांनी भरूनी वहाव्या स्मरणी पुन्हा साठूनि याव्या..। जड जाहलेल्या निरोपामध्येही खुणा पावलांच्या वेचून घ्याव्या..।। आरती जोशी-ऋचा प्रभुणे
- Get link
- X
- Other Apps
ती.... खूप मनस्वी ,, राजस ,, चमकदार ,बोलक्या डोळ्यांची,,, माणसांमध्ये असतानाही स्वतःच वेगळं जग घेऊन वावरणारी...रमणारी,लोभस पण तितकीच करारी,, निश्चयी,,अडचणींच्या वेळी वाघीण व्हायची पण प्रेमाच्या माणसांसमोर अगदी म्हणजे अगदी नेस्तनाबूत झालेली असायची. फार मोठयाल्या अपेक्षा नाहीत ,,, अवास्तव इच्छा नाहीत ,,पण स्वप्न मात्र भरपूर ...असायची सोबतीला तिच्या..वेळेनुसार जेवढं मिळावं तेवढं मिळालंही होतं अर्थात त्या त्या वेळी कष्टाच्या ,काळजीच्या स्वरूपात योग्य ती किंमत चुकवली होती तिनं... त्यामुळे स्थिरता होती ,सहजपणा होता,, मी मी करणं नव्हतं,,, उन्मत्तपणा नव्हता... एकंदरीत समाधान होतं... थोडी शहाणी - थोडी हट्टी ,,, मिश्र प्रमाण होत तिच्यात,,, माणसं जपून काळजी करणं जमत होत... फकत एकच दोष होता , कोणतीही गोष्ट करताना पार सगळंच पणाला लावायची,,, स्वतः तर स्वतःला विसरायचीच,, पण तिचं हे अस वाहून घेणं बघून तिच्या माणसांची ससेहोलपट व्हायची ,,, लक्षातच यायचं नाही तिच्या.... हात राखून करणं स्वभावात नव्हतं,,, माणसांची रीत लक्षात येत नव्हती अज...
- Get link
- X
- Other Apps
#नथ#anandigopal#firstindianladydoctor#proudwoman#pride सध्या ह्या चित्रपटाच्या निमित्ताने सुंदर हाताळलेला विषय , त्यांची कर्तबगारी आणि ह्याचबरोबर त्यांची नथ सर्वत्र झळकतेय .ह्या वेळी माझी ही खास आठवण अशी सांगण्याचा मोह आवरत नाही..... माझ्या "बाबांची" नथ😊 रुळे मोतीयांचा घोस लडिवाळ ओठांवर। त्याची खुमारी बाई ग ,ओसंडते मनभर।। असा अडसर गोड ,गुज सांगता येईना। कशी लपवू खुशीची लकेर ती कळेना।। हवासाच होता ,सोन्या मोत्याचा हा डौल। जाणत्या मनाने क्षणी ओळखला कौल।। थाट नकोच उणा,इच्छा बापाच्या मनीची। लाड पुरवू पाहे तो ,भेट देऊन नथीची।। असा दिमाख तिचा, खास किती ती झाली गं। मन ओळखीची खूण मनाजवळ राहिली गं।। नथ,,परंपरा सांभाळणार्या हिचं गारुड,,, अनेक शतकं टिकून आहे,, नव्हे तसूभरही कमी झालेलं नाही. मराठी म्हणलं की नथ अनिवार्य,,पाणीदार मोत्यांची, माणकाची साजेशी साथ, सोन्याची गुंफण ,तिचा बाकदार आकडा , लोंबता घोस,,,सगळंच कस रेखीव❤ मान, उठाव, रेखीवपणा,ठसठशीत सौन्दर्य, मूर्तिमंत सोज्वळपणा,, ही सगळी विशेषणं मिरवणारी,, भारदस्त सम्राज्ञी आहे ही. मला आठवतंय राऊ मधल्या रमा...
- Get link
- X
- Other Apps
गेल्या काही दिवसात ,व्हॅलेंटाईन वीक चे वारं जोरदार वाहतंय ,,, अगदी गुलाबी वगैरे,,,रोझ डे , चॉकलेट डे, प्रॉमिस डे , टेडी डे , हग डे,,, वगैरे च अगदी उत्साही वारं,,, लग्नाला बऱ्यापैकी वर्षे झालेली, तसं तरुणच असलेलं मन जरा नवतरुण वगैरे होण्याच्या प्रयत्नात ,,,मी आपली रोजच्या डे च्या कौतुकानुसार , रोझ (डे) दे ,चॉकलेट(डे)दे,,, टेडी(डे)दे प्रॉमिस(डे)...देच,,, असलं काहीही न म्हणता आपण होऊन मिळतंय का ह्या प्रतीक्षेत होते. नवीन,नवीन लग्न ठरल्यावर घरातून , गजरा घेऊन दे ,अस सांगून पाठवल्यावर,,शेवंतीची वेणी घेऊन भेटायला येणारा ,,, माझा "अहो"आता सणासुदीला, काही विशेष प्रसंगी(तेही , भारतीय पोशाख आहे हे लक्षात घेतल्यावरच),,, गजराच घेऊन येण्या इतपत सुधारित झाला आहे,, त्यामुळे हे असले "डेज "वगैरे लक्षात ठेवून काही आणेल हा माझा भ्रम च खरा ठरला. व्हॅलेंटाईन ची पूर्व संध्या,, कोणताही डे साजरा न होता नेहमीसारखीच ,,, ट्रॅफिक मधून आल्यावर ,, सोफ्यावर हुश्श होत ,, अहो म्हणाले,,, काय गर्दी आहे सगळीकडे ,, सगळे रस्ते बजबजलेले,, त्या व्हॅलेंटाईन डे मुले सगळ्या केक च्या ...
- Get link
- X
- Other Apps
काही दिवसांपूर्वी च ओपन डे नामक ,, सोहळा लेकीच्या शाळेत पार पडला,,, निकाल असं न म्हणता हे छान बाळसेदार , शक्यतो मार्क कमी पडले तर "निक्काल" लागल्याचे दुःख वाटू नये असं गोंडस नाव सध्या दिलेलं असत,,, हे गोड गोजिर नाव असलं तरी जे व्हायचं तेच होत असत,, ह्या मनाच्या तयारीनेच मी गेले ,, मार्क्स वगैरे ठीक ठाक होते,,, आता शिक्षकांना भेटायची वेळ,,, नेहमीच्या तक्रारी गेले अनेक वर्षं ऐकत असल्यामुळे,, नवीनच स्वयंपाक शिकणार्या किंवा शिकणारी, ला फोडणी करताना , तेलात मोहरी कधी टाकायची ह्याबाबतीत,,, जस अष्टावधान केंद्रित करावं लागतं ,, तसंच काहीसं वाटलं,जरी इतकं नाही तरी कर्णेद्रियांची तयारी करून एकदम निरागस चेहऱ्याने मी बाईंसमोर उभी राहिले,,, चैत्राची आई ,, बाकी सगळं छानच आहे , हुशार , चटपटीत आहे ,मदत करते, लक्षात ठेवते छान, (ह्या गुणवर्णना नंतर आता तक्रार काय हा प्रश्नच मला पडला नव्हता,,,)पण फार गप्पा मारते हो ,,, खूप बोलायला लागत ,, आणि अक्षर जरा वळणदार हवं अजून,,, मी आपलं हो हो ,, मी सांगते ,, करवून घेते ,तुम्...
- Get link
- X
- Other Apps
असतेच का असेही फसवेच दान हाती मिळूनि न लाभण्याचा हा वज्रलेख माथी गणती सदा सुखाची भरूनीच वाहणाऱ्या अश्रूंस का विचारी??वाहून सम्पलेल्या... आभास सोबतीचा,की धरता विरून जाई ना सूर्य ना चंद्रछाया संधीप्रकाश राही,, जरी वाट ही ,,नसावी तुझ्या चालण्याची.. पण वेळ हीच आहे , खूणगाठ बांधण्याची अस्वस्थता जीवाला ,कवडसे सुखाला सवे असणार आहे ,, समजूत ही मनाला... आरती जोशी-ऋचा प्रभुणे.
- Get link
- X
- Other Apps
हातातल्या अक्षता पडल्या......शुभमंगल!!!!!! प्रसन्न डोलणारी तुळस,, सुंदर सजवलेला बाळकृष्ण,,, मधला अंतरपाट,,, उदबत्यांचा घमघमाट,,, आवळ्यांवर लावलेल्या वाती,,, साखरफुटाणे, प्रसाद,,, उरलेले फटाके ,सगळं अगदी मनाजोगतं.. तरीही बेचैनी वाटली,, संपली ,, खऱ्या अर्थाने दिवाळी संपली,,, देवदिवाळी हे नुसतं मनाचे समाधान,,, पण अगदी खरं सांगायचं तर ह्या वर्षाची दिवाळी संपली. गावाकडचं आपलं घर आता गोकुळ नसेल,आम्हा लेकिसुनांना देऊन तळ गाठलेले फराळाचे पदार्थ तू घे , मी घे करत तसेच तळाशी असतील.आकाशकंदील एकटा, जशी आनंदाशी फारकत व्हावी असा ,कसलीतरी वाट बघत असेल... आणि हव्याहव्याश्या सुरुवातीचा नकोनकोसा शेवट ...निरोप,,,तो घेऊन आम्ही परत आलोय ..घरी म्हणावं का ह्याला?? का जॉब डेस्टिनेशन??? ........ दार उघडताच इतके दिवसांच्या साठलेल्या पेपर चा ढीग पडला,, आत पाऊल टाकताक्षणी , उद्यापासून सुरू होणारं रुटीन आणि आत्तापासून करायच्या असलेल्या कामाची यादी तरळून गेली,, सुखरूप पोचल्याचे फोन करायला हवे ,वाट बघत असण...