मन ...आजपर्यंत न कळलेली गोष्ट,खूप लिहिलं गेलंय,सांगितलं गेलंय, आपणही खूप वेळा अनुभवतो.... अनाकलनीय,अगम्य ,अथांग ....वगैरे मोठया मोठ्या शब्दांना पण अगदी साधे - सोपे सहज वाटणारे मन पूर्णतः व्यक्त करता आलं नाहिये...
ह्यामध्ये वेगळं काहीच नाहीये पण त्याच्या अनुषंगाने दरवेळी येणाऱ्या वेगळ्या अनुभवाची मात्र गंमत वाटते....म्हणून आज हे लिहिण्याचा मोह आवरत नाही.
निमित्त होतं अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीचं मंडळांनी केलेली भव्य आरास,ढोल ताशा पथक , रांगोळ्या सगळंच छान वाटणारं, नेत्रदीपकही...त्यात थोडा स्वतःचा ठसा असला तरी ते सगळं साजरं करण्याचा उत्साह ,आनंद,लगबग ह्या सगळ्यावर मोहोर होती ती मात्र लाडक्या बाप्पाची च..मंडळाचा लहानमोठेपणा ,मानपान ह्यावर उत्साहाची प्रतवारी ठरलेली नव्हती... तो सगळीकडे सारखा होता...त्यावेळी तिथे असणे ... नुसते असणे हे पण खूप छान वाटत होतं...त्याच उत्साहाचं लागिरं झाल्यासारखं....😊
............मनात विचार आला इतर काहीवेळी माणूस आपण इतरांपेक्षा वेगळं दिसावे ,उठून दिसावे म्हणून किती धडपड,आटापिटा करत असतो.सगळ्यांमध्ये आपलं वेगळेपण प्रशंसेला पात्र ठरावं यासाठी ही प्रयत्न असतात....अगदी छोट्या प्रसंगापासून काही विशेष प्रसंग असोत किंवा एखादं काम जबाबदारी पार पाडणे असो..
.प्रत्येकालाच हे विशेष पण हवं हवं वाटतं.. चुकीचंही नाही काही त्यात...
पण जेव्हा कधी उत्साह, उत्सवाचे उधाण येत ...त्यावेळी मात्र प्रत्येकजण हे विशेषपण ,किंवा त्याची इच्छा बाजूला ठेऊन त्या ऊर्जेचा एक भाग बनण्यासाठी आतुर असतो....मग ती विठ्ठलाची वारी असो गणपती नवरात्रीचे उत्सव असोत किंवा एखादा सोहळा..त्यावेळी त्या गर्दीचा भाग होऊ पाहणं हीच कदाचित मनाची रीत म्हणा गरज म्हणा ,असते...त्यावेळी त्या गर्दीचा एक घटक होऊनही मन आनंदी असतं...त्यावेळी वेगळेपणाची आस नसते..
....एकट्याचा विचार करताना आपण सगळ्यांपेक्षा वेगळे ,निराळे जरूर होतो काहीवेळा त्याचाही आनंद असतोच....पण हाच आनंद काहीवेळा फकत आणि फकत गर्दीचाच भाग बनून मिळतो.
मन कुठे ओढ घेईल ते मला माहित नाही...पण समरसून जाणं,एकात्म होणं,आणी अहंकार बाजूला ठेवणंसुद्धा...😊 मनाला शिकवण्यासाठी उत्सवासारखं दुसरं आनंदनिधान नाही.

Comments
Post a Comment