फुगे
बघ ना परत एकदा... हे इतकं सहज जमतंय का..
क्षणभर का असेना,, सगळं साधं-सोप्पं राहतंय का...
ह्या,फुग्यांइतकं हलकं...मन तरंगतंय का कधी आता..
इतकंही रंगीत काही वाटतंय?? ..थोडंसं निसटून जाता...
सोडून द्यावे विचार,,,एकदाच्या झटकून टाकाव्या चिंता
ओझं नको , खंत नको,, जरा तसाच राहू दे ना गुंता..
कुठे कसलेच आयाम नकोत आता मनमोकळं हसताना
एक फुंकर एक झुळूक,बघ दिसतं का सगळं विरताना..
आरती जोशी-ऋचा प्रभुणे.
Comments
Post a Comment