दिवस :आठवाड्यातला कोणताही
वेळ :दिवसातली कोणतीही
फोनची रिंग वाजते ... आई ... कॉलिंग... कित्तीही वर्ष झाली लग्नाला तरी हा फोन बघितला की हसू येतच मनात.फोन उचलते आई तिकडून विचारते,काय चाललंय ???झाल का सगळे आवरून , सुरुवात साधारण अश्याप्रकारे झाली की आई हळूच विचारते आहे ना वेळ?मी अगदी झोकात होहो म्हणले की आई सुखावते, धबधब्यासारखी सुरुवात करते .. अग काय परवा करते म्हणालीस फोन आणि नंतर फोनच नाही मी वाट पाहिली मग मला वाटलंच काहीतरी काम असेल.. म्हणून मी आज केला...
मी नेहेमी सारख काय आणि कसे झाले ते सांगते...जरा जुजबी बोलणे होतं तेवढ्यात मोबाइल मधलाच अलार्म आठवण करून देतो की लेकीबाईंना शाळेतून आणायला निघण्यासाठी 10 च मिनिट राहिली आहेत ... आणि हळूच मधेच थांबवत मी आईला म्हणते ,आई मी तुला नंतर करु का मी तिला ना शाळेतून घेऊन येते हं....अच्छा........
......... ....... .... हं बाय बाय......
हा फोन ठेवला जातो ते पुढच्या आठवड्यात परत आई कॉलिंग बघितल्यावरच उचलला जातो....😢
..................
तो किंवा तसाच एक दिवस ,संध्याकाळची वेळ रामरक्षा म्हणतांना माझी मुलगी विचारते आई पणजोबा ही वेगळ्या चालित म्हणतात आणि तू वेगळ्या...तुला कोणी शिकवली ग..
आणि मी तिला सांगते मला माझ्या आईने शिकवली म्हणून मी तुला अशी शिकवतेय.... आणि त्याचवेळी नेमके आठवत अरेच्चा आईला फोन करायचाय... आता एवढे होऊ दे मग निवांत करू ....
........... हे स्वतःलाच सांगताना मला आईचा प्रश्न आहे ना वेळ??? ... आठवतो आणि थोडेसे हलल्यासारखं होतं.जाणवते की आपण इतके का बुडून गेलोय की थोडाही वेळ नाहीये....
मला कधी तिला हा प्रश्न विचारण्याची वेळच नाही आली . आई साडी नेसवायचिये , माझ्या मैत्रिणी येणार आहेत बरका, मी आले की आपण जाऊ लक्षात आहे ना?आई संध्याकाळी माझं पाठांतर घे ...... एक ना अनेक.... आई असणारे हे गृहीतच...
ह्या तंद्रीतून बाहेर आले ती चैत्राच्या आई..... आज प्रोजेक्ट करूया ना ... ह्या प्रश्नाने.. आणि मग तिच्या मध्ये गुंगून गेले...
मला त्यादिवशी एक गोष्ट आठवली ...
राजा राणीची एकुलती एक राजकुमारी जी गळ्यात पडून म्हणायची मी कद्धी कद्धी सोडून जाणार नाहीये ... आणि असे म्हणता म्हणता कधी संसारात रमली हे ही कळले नाही..
राणी मग कधीतरी उदास व्हायची ,लेक सुखात आहे खरी..आठवण आली की दिसत मात्र नाही... तेंव्हा राजकुमारीने तिला एक लोलक दिला आणि म्हणाली आई ह्यामध्ये दिसेन मी तुला... आणि राणी खुश, हवे तेंव्हा बघणे तिला अजून काय हवे होते....आणि मग आनंद आनंद....
गोष्ट आठवली आणि वाटले .. आज कितीतरी साधने आहेत संपर्काची... टेक्नॉलॉजी ने ही सोय छान केलीये ... पण त्यातही त्यायोगे बोलण्यासाठी साधा वेळ पण काढता येत नसावा😢
आई, आठवण तर रोज येते फकत तुझ्यापर्यंत पोचवायची राहून जाते... तुझ्यासारखे कुळथाचे पिठले ,आंबाडीची भाजी,थालीपीठ.... तू मला शिकवलेली गाणी,आमच्या वेळा पाळण्यासाठी तू केलेला आटापिटा ,बागेत घेऊन जाऊन दिलेले झोके आणि घसरगुंडीवरून यायची भीती वाटत असतांना तू दिलेला धीर...
आमच्या बोबड्या आवाजातली गाणी टेप करण्यासाठी तुझी धडपड ...आणि त्याच बोबड्या बोलातही रामरक्षा, अथर्वशीर्ष शिकवण्यासाठी आग्रह .एक ना अनेक नुसत्या लहानपणीच्याच नाही तर प्रत्येकवेळी वेगळं काहीतरी होतांना तुझी सोबत .... ..सगळंच आठवत फकत सांगायचं राहून जातंय
हे सगळे आमच्यासाठी करतांना मला फकत माझी आईच दिसत होती..पण आज ... तुझ्यातली त्यावेळची मुलगी पण दिसतेय.... कारण तिथे आता मी आहे ...बघ ,हे मात्र तू न शिकवताच मला कळलय... ज्यासाठी इतकी वर्ष लागली.
मला माहितीये तु नेहेमीप्रमाणे समजून घेणारच,पण तरी ... आई तुझी आठवण रोज येते जेंव्हा मी तुझ्यासारखच सगळं माझ्या लेकीला शिकवतेय... तुझीच गाणी ,तस्साच गजरा, तस्सच पोळी फुगताना दाखवणं ,तस्साच भातुकलीचा खेळ मांडणं, तसंच अभ्यासासाठी मागे लागण,,,सगळं सगळं थेट तुझ्यासारखच करतेय आणि तिला वाटतंय आपली आई शिकवतेय आपल्याला😊
माझ्या लेकीला माझ्या आईने मला शिकवलेलं पुढे देतांना तुझी लेक कधीतरी तुझ्यासाठी मात्र वेळ काढू शकत नाहीये बरं...
मला माहितीये मला असे बघून सुखावतच असशील तू...तरी ही
हे चक्र चालत आलय... चालूच राहील ... पण त्यातही खास फकत तुझ्या आणि माझ्या वेगळ्या आठवणीसाठी हा लिहिण्याचा घाट...
फोन ,पत्र,विडिओ कॉल सगळ्यांच्या पलीकडे जाऊन जास्त कनेक्ट राहणारा ...
हाच आठवणींचा लोलक म्हण हवं तर.. की जो कधीही बघ... मी असेनच कधी मी तुला वेळ द्यायला कमी पडत असेन तरी तुझ्यासाठी माझं कायम असणे नक्कीच जाणवून
देईल.
आरती जोशी-ऋचा प्रभुणे

Comments
Post a Comment