ती.... खूप मनस्वी ,, राजस ,, चमकदार ,बोलक्या डोळ्यांची,,, माणसांमध्ये असतानाही स्वतःच वेगळं जग घेऊन वावरणारी...रमणारी,लोभस पण तितकीच करारी,, निश्चयी,,अडचणींच्या वेळी वाघीण व्हायची पण प्रेमाच्या माणसांसमोर अगदी म्हणजे अगदी नेस्तनाबूत झालेली असायची.
फार मोठयाल्या अपेक्षा नाहीत ,,, अवास्तव इच्छा नाहीत ,,पण स्वप्न मात्र भरपूर ...असायची सोबतीला तिच्या..वेळेनुसार जेवढं मिळावं तेवढं मिळालंही होतं अर्थात त्या त्या वेळी कष्टाच्या ,काळजीच्या स्वरूपात योग्य ती किंमत चुकवली होती तिनं... त्यामुळे स्थिरता होती ,सहजपणा होता,, मी मी करणं नव्हतं,,, उन्मत्तपणा नव्हता... एकंदरीत समाधान होतं...
थोडी शहाणी - थोडी हट्टी ,,, मिश्र प्रमाण होत तिच्यात,,, माणसं जपून काळजी करणं जमत होत...
फकत एकच दोष होता , कोणतीही गोष्ट करताना पार सगळंच पणाला लावायची,,, स्वतः तर स्वतःला विसरायचीच,, पण तिचं हे अस वाहून घेणं बघून तिच्या माणसांची ससेहोलपट व्हायची ,,, लक्षातच यायचं नाही तिच्या.... हात राखून करणं स्वभावात नव्हतं,,, माणसांची रीत लक्षात येत नव्हती अजूनपण तिच्या..
अशी ती ....नाव काय बरं... असो काहीही ,,तिच्यासारखी ती...
रोज दुपारची ,, वेळ तिची खूप आवडीची ,, थोडीशी सुस्त, सकाळच्या घाईगडबडीचा लवलेश नसणारी,
थोड्या वेळापुरतं सगळं थांबल्यासारखं,,, शांत संध्याकाळची हुरहूर नाही ,की भारलेली रात्र नाही...
तिची ठरलेली आवडती जागा ,, खिडकीला लागून असलेला लांबरुंद कट्टा ,, समोरच बहरलेला चाफा,, अंगणात रेखीव रांगोळी,,, आवळ्याची सावली...अगदी ठरल्यासारखं त्याचवेळी वाहणारं वारं ,तेही त्या दुपारसारखंच शांत...खिडकीच्या गजाला ,सकाळी आठवणीने ओवून ठेवलेली चार फुलं बांधायची ,, कधीकधी आग ओकणाऱ्या दुपारच्या वेळाही मग ह्या सगळ्या जाम्यानिम्याला भुलून अलवार व्हायच्या,,, तिला तेवढं ही पुरायचं.
फकत तिच्या असलेल्या ह्या वेळेत तीची तिलाच ती भेटायची ,,, छानसं आठवायची,, कधी जुन्या आठवणींना वाट करून द्यायची,,, शहाणं सुरतं होऊन परत स्वतःचीच समजूत काढायची..बाहेरचे अनुभव आठवायची ,,, मनाशी काहीतरी ठरवायची ,,, शिकायची,,, ती जागा म्हणजे सगळंच होतं तिच्यासाठी..
पण अलीकडे खिडकीपलीकडंच जग तिला जास्त खुणावत होत ,, काहीतरी राहिलेलं ,, सुटलेलं , करायचं राहून गेलेलंच ,,, जास्त खुपत होतं ,,, ठरवलं तिनं ,, कदाचित कधी योग्य वेळ नाही म्हणून कधी व्यस्तता म्हणून ,, कधी अंतर म्हणून ,, मध्येच दुरावलेली माणसं ,, मैत्र, राहून गेलेल्या गोष्टी ,,, परत सामावून घ्यायच्या,,काय हरकत आहे ??परिपूर्ण नसतंच काहीच,,, पण प्रयत्न करायला काय हरकत....हाच ध्यास...
आणि तिथून पुढच्या कित्येक दुपारी ,,तिच्या ह्या वेडापायी,, स्वतःलाही न भेटता घालवल्या.... ती जिथून पाहत होती तिथून सगळंच ,सहज , छान निर्मळ होतं... पण वेळ आपल्यानुरूप सगळंच बदलून जाते ,,हे समजलं च नाही तिला ,,, माणसं बदलली, गोष्टी आधीसारख्या सहजसाध्य राहिल्या नाहीत,,,कदाचित तिनं जसा विचार केला होता तसं काहीच राहील नव्हतं.. एकंदरीत जगाची रीत समजली ...होणारच होतं ते तसं...दुखावून ,,थकून निराश झाली ,
....तेंव्हाच खिडकीच्या गजावरचा वाळलेला गजरा फडफडला,,, ती आली ,,, तो गजरा काढून टाकला.. कितीतरी दिवसांनी तीच वेळ ,,, अवतीभोवती सगळं तसंच...तीच अनोळखी वाटत होती स्वतःची स्वतःला.. ती विसावली ...स्वार्थी झालोे आपण.. वाटून गेलं..असा इतका कसा ध्यास अप्राप्य ते शोधण्याचा , मिळवण्याचा....
तिथेच डोकं टेकवून बसली,, त्या वेळेनं ,,, तिच्या जागेनं सहज सामावून घेतलं ,,, आधीसारखंच...
तिला कळून गेलं ,,,,,
बाई ग,, आयुष्यात बेरीज जरूर कर,, पण स्वतःला वजा करून नाही,, प्रसंगी वाकण्याची तयारी ठेव ,,पण प्रत्येकवेळी नाही,,नवीन गोष्टींचा अनुभव जरूर घे ,,, चौकटीत राहून नाही बाहेर पडून ही घे...पण जवळच्या गोष्टी गृहीत धरू नको,,, वाईट वाटेल ,, मोडून पडशील ,,पण फकत हरलीस म्हणून परत येऊ नको , तुझ्या कौतुकाचा आनंद बघायला म्हणून ये... कितीतरी गोष्टी आहेत तू समजून घेण्यासारख्या,,, त्या समजतील तुला वेळेनुसार,,जपून ठेव ,,त्या आठवणींनी क्लेश होऊ देऊ नको ,,, तू शहाणी हो आणि निर्मळपणा सोडू नको कारण बाकी सगळं मिळवता येईल पण हा असावा लागतो...
......ती हसली ... तशी शहाणीच होती..प्रत्येक गोष्ट हळूच येते ,,स्थिरावते ,, त्यासाठी अट्टहास न करता फकत प्रयत्न करत रहावं हेच तिला समजलं होतं... ..
पुढचं माहिती नाही ,,, कारण ,,, हातचं राखून वागणं तिच्या स्वभावात नव्हतं😊
.....................................
अश्या बऱ्याचश्या "ती" आपल्यात असतात आणि अश्या जागा,अशी माणसं आपल्याही बरोबर असतात खरचच "अमूल्य" ,, ह्याचा अर्थ कळून जातो..हो ना??
आरती जोशी-ऋचा प्रभुणे

Comments
Post a Comment