दिवस :आठवाड्यातला कोणताही वेळ :दिवसातली कोणतीही फोनची रिंग वाजते ... आई ... कॉलिंग... कित्तीही वर्ष झाली लग्नाला तरी हा फोन बघितला की हसू येतच मनात.फोन उचलते आई तिकडून विचारते,काय चाललंय ???झाल का सगळे आवरून , सुरुवात साधारण अश्याप्रकारे झाली की आई हळूच विचारते आहे ना वेळ?मी अगदी झोकात होहो म्हणले की आई सुखावते, धबधब्यासारखी सुरुवात करते .. अग काय परवा करते म्हणालीस फोन आणि नंतर फोनच नाही मी वाट पाहिली मग मला वाटलंच काहीतरी काम असेल.. म्हणून मी आज केला... मी नेहेमी सारख काय आणि कसे झाले ते सांगते...जरा जुजबी बोलणे होतं तेवढ्यात मोबाइल मधलाच अलार्म आठवण करून देतो की लेकीबाईंना शाळेतून आणायला निघण्यासाठी 10 च मिनिट राहिली आहेत ... आणि हळूच मधेच थांबवत मी आईला म्हणते ,आई मी तुला नंतर करु का मी तिला ना शाळेतून घेऊन येते हं....अच्छा........ ......... ....... .... हं बाय बाय...... हा फोन ठेवला जातो ते पुढच्या आठवड्यात परत आई कॉलिंग बघितल्यावरच उचलला जातो....😢 .................. तो किंवा तसाच एक दिवस ,संध्याकाळची वेळ रामरक...
Posts
Showing posts from August, 2017
- Get link
- X
- Other Apps
आज फादर्स डे .... बाबांसाठी.. बाबांबद्दल काय आणि कसे लिहावे... फारसे व्यक्त केलं जातं नाही ते यादिवशी सांगायची संधी आहे बाबा म्हणलं की माझ्याच कुटुंबातले जवळून अनुभवता आलेले सगळेच बाबा लोक मला आठवतात .. माझे आजोबा, माझे बाबा आणि आता माझ्या लेकीचा अरे बाबा.. आज तुम्ही सगळे अवतीभोवती असल्याने मी भाग्यवान आहे हे शब्दही माझ्या मनातलं सगळ व्यक्त करायला पूरे पडणार नाहीयेत. माझे बाबा .. कर्तबगार,अत्यंत हुशार ,वाचनप्रिय,ओघवते वक्तृत्व, प्रामाणिकपणा,रुबाबदार व्यक्तिमत्व,अजून खूप काही ... आमच्याबरोबर बऱ्याच लोकांना माहीत असलेल्या ह्या बाजू ग्रेट आहेतच... पण माझ्यासाठी तरी ते घरात आल्यानंतर फकत आमचे बाबा म्हणून आमच्यासाठी असायचे तेच बाबा साहजिकच खूप जास्त जवळचे वाटतात. . ...बाबा,मी आणि माझी बहिण ...आजसारखं अगदी हायफाईव देण्याइतपत मोकळेपणा नव्हता ..पण कधीतरी गम्मत म्हणून आईला चिडवण्याच्या कटात सामील होण्याचा मिश्कीलपणा नक्कीच होता.आई तुला नाही आमची गम्मत सांगणार असे म्हणले तरी आई कौतुकाने का ह...
- Get link
- X
- Other Apps
When u do things as Ur brain says, Ur heart will be deceived ...n when u go by Ur heart it may seems to be illogical .... But sometimes it's nice tobe illogical as it never immitates..... ......😊कधी मी मनातले विचार व्यक्त करतांना English भाषेतून करेन असे वाटले नव्हते ... एक तर ही मातृभाषा नाही त्यामुळे त्यात कदाचित सहजता वाटत नसावी ... किमान मला तरी .. आणि चुकण्याची भीती .....;)पण तरी ...अगदी सहज मनात विचार येतोय आणि लिहितेय ... Just going with my heart..;)... भावनिक निर्णयाच्या दिशेने जाऊ इच्छिणारी माणसे आणि फकत विचारांच्या दिशेने निर्णय घेण्याला प्राधान्य देणारी माणसे... यांच्याबद्दल... जेंव्हा तुम्ही फकत वैचारिक निर्णय घेता तेंव्हा कदाचित मनातला आवाज दाबून टाकता किंवा त्याला वेगळ्या वाटेवर नेऊन तेच बरोबरआहे ही समजूत करून घेता... आणि जेंव्हा भावनिक प्राधान्याने निर्णय घेता त्यावेळी ते तर्कशुन्य कधी कधी पूर्णतः असंबद्ध वाटतात पण कधी कधी असे होणंही चांगलं असते. कारण त्यात दिखावा नसेल. ...