कळावे असे ह्या जीवाचे  जीवाला
जसा दर्पणि चेहरा की पहावा।
नसावा आता भार शब्दांवरीही
आकांत  अंतरीचा मुक्याने सहावा।।

तुझ्या आठवांना कश्याचे दिलासे..
नेणीव होऊ पाहे सुखाचे कवडसे।
करावा मोकळा श्वास  वेढ्या सवेही
निसटत्या क्षणांचे उमटू द्यावे ठसे।।

व्यथा आसवांनी भरूनी वहाव्या
स्मरणी पुन्हा साठूनि याव्या..।
जड  जाहलेल्या निरोपामध्येही
खुणा पावलांच्या वेचून घ्याव्या..।।

आरती जोशी-ऋचा प्रभुणे

Comments

Popular posts from this blog

अन्नपूर्णेचा घास

फुगे

मेतकूट