Posts

Showing posts from July, 2019

अपूर्णत्वातलं पूर्णत्व

 अपूर्णत्वातलं पूर्णत्व 'तिची' लेक आज सगळा थाट करून पहिल्यांदाच "स्टेज" वर  आली होती,,कित्ती सुरेख शोभत होती, अगदी नजर हटू नये इतकी,, अगदी मधोमध उभी,रंगमंचावरच्या प्रखर प्रकाशझोतात ती तर उठून दिसतच होती,, आणि तिच्या चेहरयावरचे शोधक भाव ही,,, प्रेक्षकांमध्ये 'ती 'ही बसली होती,अगदी  ह्याच क्षणाची वाट बघितल्यासारखी,, जे तीचं स्वप्न ,स्वप्नच राहीलं होत,, आणि  ह्या तिच्या लेकीच्या बाबतीत मात्र कल्पनेत न राहता प्रत्यक्ष रूप घेत होत,,,ते पुन्हा एकदा आसुसून जगत होती.कार्यक्रम सुरू झाला,, देखणा पदन्यास, आत्मविश्वासपूर्वक हालचाली,लहान चेहरयावर, वयाला साजेसेच,पण कळते विभ्रम,, आणि ताईच्या डोळ्यातलं कौतुक,,, हे सगळं बघून हरखून गेली,,, 'ती' कार्यक्रम सम्पला,, टाळ्यांचा गजर झाला,ही  देखील टाळ्या वाजवत होती,,, जश्या सगळ्यांच्या आवाजात फकत हिच्या आणि हिच्याच टाळ्या  ऐकू जाव्यात इतक्या आवेशाने,,, 'तिला'  घरच्यांचा उद्वेग आठवला,,, ते म्हणायचे तसं,,,,आयुष्य गेलं असतं असंच टाळ्या वाजवत जगण्यात,, योग्य वेळी दिशा मिळाली, आपल्या सारख्यांना अभावानेच  मिळणारा मदतीचा...
एका भेटीची गोष्ट....♥ तिचा उत्साह  आज वेगळाच होता,,, माहेरी आलेली असूनही विचार सगळे त्याचेच.. त्याला हे आवडतं,,, हा रंग, हे कानातलं,, घट्टशी वेणी आवडायची नाही त्याला,, आज नकोच,,, होऊ दे केसांची झुळुकदार वळणं,, मनासारखी,,, कित्ती तयारी ,लगबग,,, अगदी पहिल्यांदा भेटायचं असल्यासारखी,,,नकळत येणारं हसू, गमतीची लपवाछपवी,,,अगदी कोणालाच कळू नये  म्हणून किती तो आटापिटा,,, थोडीशी सहजता होती ,, जाणीवपूर्वक तिने ती  डोकावू सुद्धा दिली नाही,, ओळखीचं काहीच नकोय हं आज,, सगळं नवीन,,,,परत एकदा...??? परत एकदा हेही नको म्हणायला... तिकडे ,,त्या घरी,,,,तोही तयारीत,, बेमालूमपणे" सिक्रेट"  पोटात ठेऊन वावरत होता,,, त्यालाही त्यांची गम्मत  अशी च कळू द्यायची नव्हती,,, कोणालाच अगदी ठरवून न केलेले फोन,, आदल्या दिवशी झालेल्या बोलण्यावर बरोब्बर  ठरलेल्या ठिकाणी भेटले,,, दोघंही हसले,, आधीसारखेच का??😊जायचं??तिने विचारलं... जायचंच,,, चल 👫.. तोच रस्ता, परत नवीन होऊन त्यांच्यासाठी वळण घेत पुढे जात होता,, आणि त्यांच्या मनात पुढे जाताना आठवणींचा प्रवास मात्र उलट होत होता,,,, ए हे बघ,...