पोस्टमध्ये ,,सर्वप्रथम चित्रकविता: प्रिय वन्स अर्थात् ... दीपाली प्रभुणे कुलकर्णी
😊
कुणाची अंतरंगे कधी
कुणा नाही उमगली
अंतरी श्रीफलाच्याही
जन्मली बाळे जुळी
..........................
 जन्मजन्मांतरीची साथ ही
या जन्मातही ना सुटली
करवंटीच्या कठोरतेतही
मलईदार प्रीत बहरली
...........................

आज सकाळी आईने एक नारळाचा फोटो पाठवला...  जुळा नारळ,,, एका नारळात दोन...मी पहिल्यांदाच पाहिला,,,
मजा वाटली ,,म्हणलं  लेकीला दाखवू,,,
...ती शाळेतून आल्या आल्या तिला दाखवला,,,  अय्या बघू बघू म्हणत  तिनंही गमतीनं बघितला...हसली बाबा एकदाची ,,सकाळीच काही कारणावरून झालेली  कट्टी संपली ...रूसारुशीचा अध्याय संक्षिप्त ठरला आणि थोडक्यात  भागलं ,,म्हणून मी सुटले म्हणलं...चला एका दगडात दोन पक्षी....
.........
तेवढ्यात नणंदेचा मेसेज...अय्या खरंच असा आहे का???...आणि उत्तरानंतर  अर्थातच पुढचा काही वेळ गप्पा ,, चॅटिंग ...खूप दिवसांच राहिलेलं बोलणं असा मजेत गेला ,,,,  पटकन एक- दोन   चित्र कविता  अगदी सहज गम्मत म्हणून बोलता बोलता केल्या तिनं ...छानच करते ती..पण  सांगू का नको,, ... फेबु वर पोस्टू का नको ह्याच विचारात राहून जातं  नेहमीच तिचं...आज ठरवलंच आपणच  पोस्टायची😁😁😁 तिची कविता(अर्थात नावासकट)...ठरवलं... आणि म्हणलं
...गप्पा पण झाल्या आणि कविता पण चला एका दगडात दोन....😇
....
इकडंच तिकडंच बोलताना सहज अ(रे)होंना दाखवलं आणि म्हणलं पण आता खोवायचा कसा हा असा नारळ  ,,??🤔🤔त्रासच होईल नाही???
चाललेल्या कामावरून नजरही न हटवता ह्याचं  उत्तर...खोवायचा नाही मग!!!...वाळवायचा ,,सहज कोरडं खोबरं काढता येईल...खरंच की ...असा कौतुका चा विचार  माझ्या मनात येईपर्यंत... मार्मिक टोला बसला..तुझं कसंय..ठरलंय तस्सच,, तेच स्वतःच्या मनाप्रमाणे च झालं पाहिजे, असा हट्ट असतो ना तुझा, म्हणून तुला हे असे प्रश्न पडतात... माझं तसं नाहीये म्हणून....
मी मनातच कबूल.. कबूल.. कबूल..त्रिवार  मान्यता 🙄😏😏😏
म्हणायला  सहज बोलणं म्हणून ,,,पण टोमणा मारायची संधी काही सोडत नसतात हे नवरे ... आणि अगदी शेवटी ह्यालाच म्हणतात ....
एका दगडात दोन पक्षी....🤓😂😂😂
.........…….....................................................
गोष्ट छोटीच ,, मजा पण  थोडीच, पण आठवणी मात्र भरपूर... 😀😊😇

Comments

Popular posts from this blog

अन्नपूर्णेचा घास

फुगे

मेतकूट