आज एक विषय असाच बोलता बोलता माझ्या समोर आला की ,आपण किंवा आधीच्या पिढ्यांनी ज्याप्रमाणे उन्हाळी सुट्टीचा आनंद घेतला त्याप्रमाणे आताची मूलं का घेऊ शकत नाहीत किंवा तो तसा घेता यावा ह्यासाठी काय करावे
 म्हणून थोडे लिहिण्याचा प्रयत्न करतेय... आपले मत जरूर सांगा...
पहिला प्रश्न हा की मुलांना आपल्यासारखी सुट्टी मिळत नाही हा.... विस्तारलेला आवाका मग  तो सगळ्याच गोष्टींचा असो स्पर्धा , ज्ञान, इतर कलागुण  ,संधींची उपलब्धता त्यासाठी सर्वतोपरी किमान पात्र   ठरण्याची धडपड ... त्यासाठी करावे लागणारे विशेष प्रयत्न,  सिद्ध करण्यासाठी  सामोरे जावे लागते अश्या अनेक पातळ्या  ... आणि हे सगळे केले नाही तर सध्याच्या परिस्थितीत  स्थिर आयुष्य जगण्यात येणाऱ्या अडचणी ... ह्यातला कुठलाच संदर्भ किमान १० वि पास होईपर्यत  आपल्याला नव्हता जो ह्या मुलांना पहिली पासून हल्ली असतो असे म्हणले तरी चालेल .. कारणे  काहीही असोत पण हा फरक खूप मोठा आहे .
.....ज्याप्रमाणे आपले आजी आजोबा आणि आपली पिढी ह्यात  त्यांना आणि आपल्याला जे फरक जाणवले तेच जरा जास्तच जलद आपल्याला जाणवत आहेत. आपलं बालपण आपण  छान घालवले  आता आपल्या मुलांना एकाचवेळी ते बालपण रम्य घालवणे आणि स्पर्धेला की जी थोड्याफार अंशी गरजेची पण आहे त्याला पुरे पडणे अशी  कसरत करावी लागते .ह्यात पालकही वाहत्या पाण्याच्या प्रवाही नियमाने सहभागी होतात किंवा व्हावेच लागते...  ह्याला  कारणे  कदाचित दोन्ही पिढ्यांनी बदल नीट  न स्वीकारता आपल्याच मतांबद्दल टोकाची भूमिका घेणे व विभक्त होणे , गैरसमज , काही अंशी सोपे जीवन अंगवळणी पडणे किंवा सध्याच्या परिस्थिती मुळे सोयीस्करपणे ते स्वीकारणे  अशी एक ना अनेक कारणे आहेत त्याबद्दल चर्चा होतेच.... आता प्रश्न हा की मग ह्यावर मध्य कसा काढायचा... तर कुठे थांबायचे हे मुलांना शिकवले पाहिजे नपेक्षा आधी आपणच ते शिकले पाहिजे ...
.....काही वेळा अतिरिक्त शहरिकरणामुळे,शहरी भागात राहणाऱ्या व त्या मानाने निमशहरी वा ग्रामीण भागात राहणाऱ्या, भावंडांमध्ये नाते निकोप नाही  त्यामुळे सुट्टीत कोणत्याही नातेवाईकांच्या  गावी जाऊन राहणे कसे शक्य होईल हा प्रश्न येतो.....हे मला पटत नाही कारण, मुलांच्या काही सवयी असतात त्या फकत वेगळ्या होऊ शकतात पण त्यावरून टीका तर लहान मुले करू शकत नाहीत त्यामुळे हा न्यूनगंड काही वेळा उगाचच पाळला  जाऊन ही दरी निर्माण होण्यासाठी कदाचित पालकच नकळत हातभार लावतात .... कारण शहरी असो किंवा ग्रामीण भाग .... मूल हे भावनाप्रधानच असते...
काही वेळा इच्छा असून त्या मुलांना  आणि पालकांना आप्तेष्टांची भेट घेता न येण,,,,यामुळे कदाचित हे अंतर वाढत असेलही ... पण माझ्या मते आपली माणसे अशीच असतात की भौगोलिक अंतर किती ही असेल तरी कधीही भेटलो की कालपरवा भेटल्यासारखं मधली वर्ष गळून पडतात ... आजची मूल पण ह्या भावनिक कुतर ओढीचे बळी  ठरतातच ह्यावर अनेक उपाय सुचवले गेले आहेतच आपणही ते  अमलात आणायचा प्रयत्न करतोही .... थोडक्यात काय तर कुठे थांबणे हे माहीत असणे ,आपली सर्व व्यवधान  सांभाळून नाती कशी जपावित  हे मुलांना सांगणे सध्याच्या व्यावहारिक  परिस्थितीशी जुळवून घेत असतानाच आपल्या   कौटुंबिक भावनिक  गोष्टींचाही बोट घट्ट पकडून ठेवणे ,आपले संस्कार जपणे ,सामाजिक भान ठेवणे आणि कुटुंबापालिकडेही कुटुंबच वाटेल अशी माणसे जपणे  .... आणि माझ्या मते सगळ्यात महत्वाचे म्हणजे एखादी  अनितीमान किंवा अयोग्य म्हणू ,,अशी गोष्ट खूप जणांनी  केली की ती बरोबरच असते हा पसरलेला समज  कसा चुकीचा आहे हे मुलांना समजावून सांगितले तर नक्कीच मूल बदलत्या काळातही सुट्टीचा आनंद त्याच बरोबर कुटुंब जिवलग मंडळींचे बंध  जपणे या गोष्टी करून खरा आनंद मिळवू शकतील ... हो ना☺
आरती जोशी-ऋचा प्रभुणे.

Comments

Popular posts from this blog

अन्नपूर्णेचा घास

फुगे

मेतकूट