प्लॅस्टिक बंदीचा निर्णय सध्या अगदी गाजतोय...नेमेची येतो मग... ह्या उक्तीप्रमाणे जोक्स, पोस्ट , वैचारिक चर्चा यांचा भरणा आहे ,,, पण ...आज परत ह्याच विषयावरून मला माझ्या आजीची आठवण होते , प्रत्येक लहानमोठ्या गोष्टीत अश्या पद्धतीने सर्वप्रथम कुटुंबाची आठवण होणं ...हे का???.. कुटुंबातील, मोठी माणसं एखादी गोष्ट बिंबवतात ती त्यांच्या वागण्यातून,,, संस्कार हे सांगून केले जात नाहीत , वागण्यातून होतात ,,, ह्याबाबतीत मी अतिशय श्रीमंत आहे असच म्हणावं लागेल कारण अश्या गोष्टी की ज्या आदर्श समजल्या जातात ,त्या माझ्या आजूबाजूची माणस सहज करतात...श्रेयवाद म्हणून नाही पण त्या बरोबर आहेत , आणि तश्याच राहणार आहेत..म्हणून...
बदलाला विरोध नाही पण तो हितकर नसेल तर अवलंबायचा नाही ,,, साधी शिकवण .......
माझ्या घरात प्लॅस्टिक वापर हा खूप कमी , अगदी जेमतेम म्हणलं तरी चालेल इतकाच होता,,,अजिबात नाही असे जरी म्हणता येत नाही तरी, अनेक दैनंदिन गोष्टींसाठी , प्लॅस्टिक वापर शकय आणि आजुबाजूला रूढ असला तरी आमच्या घरात त्याचा शिरकाव कमीच होता...त्याला अनेक पर्यावरणपूरक असेच पर्याय वापरले जायचे...प्लॅस्टिक बंदीच्या निमित्ताने , प्लॅस्टिक पिशवी हद्दपार होणार आहे आणि आज्जीचा बटवा शब्दशः परत येणार आहे.. त्या निमित्ताने हा लेखनप्रपंच.....
मला आठवतं , माझी आज्जी खूप सुंदर पिशव्या तयार करायची ,, शिवणकामाची आवड ,उरलेल्या कापडाचा सदुपयोग, जुन्या पण न फाटलेल्या कपड्यांपासून पिशव्या...उरलेल्या लोकरिपासून अगदी सुरेख पिशव्या करायची.गोल पिशवी, बॉक्स पिशवी , बांगडीच्या पिशव्या, भरतकाम , विणकाम, पॅचवर्क , गोणपाट,अगदी वाळलेल्या घोसावळ्या पासूनसुद्धा अगदी छोट्या अश्या, हरतर्हेच्या पिशव्या,,, ....मला सुद्धा सुट्टीत टॉवेलच्या कापडाची पिशवी विणायला लावायची , आणि मग नवीन वर्षात तीच माझी शाळेच्या डब्याची पिशवी असायची .. वेळ घालवण्यासाठी इतर पर्याय असतानाही आवड, छंद हौस, म्हणून उत्साहाने ती नमुने गोळा करून , काही काहीवेळा अगदी शिकून घेऊन ती हे काम करायची ,,, कापडाच्या तुकड्यांची,,,, पोपट, स्वस्तिकं, बदक, हरीण, फुगेवाला अशी कित्तीतरी चित्र मग त्या पिशवीवर यायची, टिकल्यांचं विणकाम , भरतकामाची फुलं,, एक ना अनेक त्या पिशव्यावर उमटायची.. इतकी सुंदर की बघत रहावं...अनेक कामांसाठी ह्या पिशव्या वापरल्या जायच्या,,, कॉपीराईट असल्यासारख्या ठराविक कामासाठी त्या त्या पिशव्या ठरून गेल्या होत्या...
मी कॉलेजमध्ये जायला लागले आणि सभोवतालच्या आकर्षक पिशव्यांमध्ये माझ्या वापरातील आजीची पिशवी थोडी मागे लपली गेली , खरं तर,कधीकधी लाज वाटायची ...पण तिच मात्र हे प्रेम कधी कमी झालं नाही...ती म्हणायची आज ही पिशवी मागे पडलीये,, पण चुकीची गोष्ट खूप जणांनी केली की काही बरोबर होत नाही ,,, एक ना एक दिवस ही परत येईल...गेल्या काही वर्षांपासून ही जागरूकता वाढत गेलीये ,, परत महत्व प्राप्त होत गेलं.. गोधडी ,वाकळ , टोपडी, कुंचडी ह्यांच्यासारखी , उपयुक्तता म्हणा किंवा फॅशन च्या नावाखाली म्हणा....ही पिशवी झक्क पैकी परत आलीय.. कात टाकल्यासारखी,,
चंची, बटवा, शबनम ,वृंदावन पिशवी, बांगडी पिशवी, गोंड्यांची पिशवी, गोल पिशवी,झोळी पिशवी अगदी होलडॉल सुद्धा,,, नवीन नाव , थोडेफार बदल लेऊन परत आलेत.. परत एकदा आपल्या आयुष्यातला रोज लागणारा महत्वपूर्ण भाग होऊन...आणी आता ह्या प्लॅस्टिक पिशवी बंदीच्या स्तुत्य निर्णयानंतर तर ह्यांचे अढळपद असेल...
आजीने शिवलेल्या भरपूर पिशव्यांचा खजिना आत्ता परत दिसतोय,...आणि त्याच बरोबर आठवतंय आजी च वाक्य.... चांगल्या गोष्टी लांब केल्या जातात , टाकल्या जातात पण त्या परत येतातच ,,फिरून,,आणि तेंव्हा त्या आपल्याजवळ कायमच्या राहतात कारण चूक म्हणजे काय हे आपल्याला उमगलेलं असतं!!!!!
ही माझी सखी आणि तुझी आठवण दोन्ही आता रोज माझ्याबरोबर राहणार आहेत...नेहमीच...
आणि तुमच्याबरोबर पण ना???😊
@आरती जोशी -ऋचा प्रभुणे

Comments
Post a Comment