७ मार्च ...जागतिक महिला दिनाच्या एक दिवस आधी .. संध्याकाळी..व्हॉट्सएप,  टीव्ही वर कविता , लेख, काही विनोदसुद्धा ह्यांचा खच एव्हाना पडायला लागला होता ..
तीच संध्याकाळ
.कामाची प्रचंड धांदल.. माझी  मात्र धुसफूस ...असेना का उद्या  जगासाठी महिला दिन वगैरे ...इथे येऊन बघा काम करावीच लागतायेत ... इतकंच काय उदयाची तयारी सुद्धा मेली आजच करावी लागतेय ...का तर जरा कमी धावावे लागेल ना उद्या ...सलग १० मिनिटे स्वस्थ बसावे तर जमतंय तरी का,ह्याचे काय घरातल ठराविक काम केलं की विचारायचं ...माझ्याकडे आता काही काम आहे का...म्हणजे मी करू मग माझी काम ....???धुसफूस ,तणतण करत माझी गाडी आता अहोंवर घसरु लागली होती ...( नेहमीप्रमाणे😋)
चार ठरलेली घरातील काम  केली  की झाले .. आमचे तसे होते का ???घरातली काम करा ,बँक ,कलासेस,बाजार,सामान ,मुलीचा अभ्यास(हो मार्च महिन्यात हा विषय खास ऐरणीवर),....ह्यासारखे अनेक विचार आणि आणि मी  ह्यापैकी कधीतरीच करते ती काम पण ह्या यादीत वाढत होती...नाहक चिडचिड झाली की नंतर  विचार कोणते वळण   घेतील  हे मला तरी कुठे माहीत असत???🤔
......... अश्या संध्याकाळ नंतर एकदम दुसऱ्या दिवशीची  पहाटच उजाडली .. हो पहाटच... मुलीची शाळा ,सकाळच्या बॅचेस बाकीची काम..इ..इ
धुसफूस कंटीन्यू😉
त्यानंतर women's day  च्या शुभेच्छांचा भडिमार ... आणि ...इथे जगातून सगळीकडून शुभेच्छा कोसळताहेत ..पण घरात काही आहे का त्याचे किमान म्हणावे तरी ...सरप्राइझ  लांबच ... इति मी...अर्थात मनातल्या मनात (अर्थात धुसफूस कंटीन्यू😉)
नंतर जेवतांना ,,,तू साधा रस्सा केलास तरी दिलखूष हं ..ऑफिस  कँटीन मधल्या पोळ्या खाववत ही नाहीत...सवय झालीये ना  मऊसूत पोळ्यांची ,कालपासून तूझी खूपच गडबड होतेय का ग???आज जरा घे विश्रांती ही वाक्य ऐकली तेंव्हा कुठे  धुसफुशीचे स्थित्यंतर स्मित हास्यात होत होते....
सगळं आवरून  झालं आणि बसावे  म्हणले जरा तेवढ्यात ह्याचा फोन ..झालं आवरून,,  हो...जस्ट झालं अरे... (माझा रागाचा पारा ...पार खाली 😄)...
तो:कपाटातला ड्रॉवर उघड ना जरा...
आणि  मी पाहिले तेंव्हा एक सुंदर वही , पेन,काही रंग आणि चक्क चित्र रंगवण्यासाठी पुस्तक...माझा जीवच हरखून गेला वहीच्या पहिल्या पानावर लिहिलं होत ...
आरती , तुझ्यातल्या तुझ्यासाठी ...माझ्यातल्या सगळ्यांकडून
मी:हे रे काय???
तो:अग ,,,काल पासून तुझं धावणं बघतोय मी .. नेहमी थोड्याफार फरकाने अशीच परिस्थिती असते...काम पूर्ण करण्याचा आटापिटा ... मान्य आहे की अगदी  आधीसारखं  नाही वागता  येणार..लग्न झाल्यानंतर,आईबाबा झाल्यानंतर, विशेष जबाबदारी  येणार .. पण ती पेलण्याचं  इतकंही दडपण घेऊ नको...   ह्या जबाबदऱ्यांमध्ये इतकी  अडकलीयेस की मनात असून आधीसारखं वागता येत नाहीये ..मला समजतं.. अशी राहू नको ..मस्त मोकळी राहा ..सतत  इतर कोण काय म्हणेल , हे केलं तर बरं दिसेल का ...ह्यापेक्षा तुला काय करावंसं वाटत ते कर ना ... तू आहेस तर मी  आहे..आणि आपण दोघ असलो तरच सगळं...
 तुला वाटतं ते लिही , तुला अजुन पण चित्र रंगवायला आवडत ना मग रंगव  की ...बाकीचं सगळं करतांना ह्या गोष्टी मागे ठेऊ नको .. तुझ्या आवडीच्या गोष्टी सोडून देऊ नको.
मी आहे की.. ...happy women's day...आणि आजचा एकच  दिवस नाही ..रोजच...प्रत्येक वेळी बोलता येईलच असे नाही पण तू हे आजच सांगणं विसरू नको...
लग्नानंतर १० वर्ष पूर्ण होऊ घातलेली असताना हे त्याने  दिलेलं सरप्राईज..
मला जाणवलं.. रोज सकाळचा दुसरा चहा करून देणारा माझा नवरा , क्लास झाला की  खूप बोलले जाते... म्हणून गरम  असतानाच , घेत जा अस आवर्जून सांगणारा , हे अगदीच किरकोळ ...अश्या अनेक गोष्टी करताना मला शक्य ती सर्व मदत करणारा , घरातली जबाबदारी घेताना आम्हाला वेळ देता यावा यासाठी धावणारा ... माझा नवरा😊
बाबांकडे असताना ,मुलगी म्हणून  लाड होताना, ह्या महिला दिनाचं विशेष काही वाटायचं नाही , पण लग्न झाल्यावरही  .तू विशेष च आहेस ..नेहमीच ...हे जाणवून देताना , मित्र .. नवरा ..आणि  माझ्यातली लहान मुलगी तशीच राहावी म्हणून प्रसंगी बाबा च्याही भूमिकेत शिरणारा ...माझा नवरा ...
आज ह्या दिवसाचे निमित्त साधून मला तुला आणि तुझ्यासारख्या अनेक पुरुषांना थँक्यू म्हणायचंय...
की जे ...रोजच...आपण विशेष काही करत आहोत असा अभिनिवेश न बाळगता , बायकी काम कशाला हवी करायला ???अश्या  प्रश्नांकडे साफ दुर्लक्ष करून , गरज असेल तेंव्हा आमच्या पाठीशी भरभक्कम पणे उभं राहून संसाराचा तोल सांभाळायला मदत करतात ...खूप खूप धन्यवाद ..
आणि हो...महिला दिनाच्या शुभेच्छा ...लिहिणं जास्तच लांबलय...पण...मन भरून आल्यावर  नंतर विचार कोणते वळण घेतील हे मला तरी कुठे माहिती असते🤔😋
ताजा कलम:माझी लेक आमच्या घरी सांगतेय बाबानं  किनई  माझ्या ऐवजी आईलाच चित्राचं पुस्तक आणि रंग  दिलेत.. वुमन  डे च गिफ्ट म्हणून😂😂...
 .. .ह्या  भेटीतले सुंदर रंग कळायला तिला अजून अवकाश आहे 😇..
आरती जोशी-ऋचा प्रभुणे

Comments

Popular posts from this blog

अन्नपूर्णेचा घास

फुगे

मेतकूट