झाले आभाळ मोकळे
आसमंत बहरले
सोनचाफ्याची पावले
अंगण नाचले नाचले
कसे आवरू सुखाला
कसे सावरू जिवाला
मन मोराचा पिसारा
सये भिजला भिजला
अशी सय येता त्याची
जीव होई सैरभैर
वाटे इन्द्रधनू आड
तोच लपला लपला
आरती जोशी-ऋचा प्रभुणे

Comments

Popular posts from this blog

अन्नपूर्णेचा घास

फुगे

मेतकूट