सध्या व्हॉट्सअप किंवा फेसबुकवर खूप चांगले लेख वाचनात येतात ..माझ्याही मनात हा विचार कित्ती वेळा येतो.. पूर्वी आणि आता ह्यामध्ये असलेला फरक... काही चांगल्या गोष्टी आपण अंगिकारल्या पण त्याचवेळी काही खूप चांगल्या गोष्टी दुरावत पण गेल्या.हा आज आणि पूर्वी मधला फरक पिढीगणिक सगळ्यांनाच जाणवतो..पण अश्यावेळी नवीन गोष्टींचे बोट पकडताना चांगले ते जपायचे,वाढवायचे ...आणि पुढच्या पिढीला त्याचा वारसा द्यायचा आणि अजून समृद्ध करायचे हे काम आई बाबा आज्जी आजोबा किंवा मोठी माणसे म्हणू ह्यांच्याकडून व्हायचं...आजचेही आईबाबा करतात..पण कधीतरी धावती जीवनशैली जी अतिसमृद्धीबरोबर नियमानेच आली आहे ..तिच्याबरोबर कसरत करत सगळे सांभाळताना वाटते की काहीवेळा हा वारसा द्यायला आपण कमी पडतो का..किंवा अगदी माझ्याच बाबतीत बोलायचे झाले तर असा काय आहे जे आजही सक्षमतेने मी जपून वाढवून माझ्या लेकीला पुढे देऊ करेन?
ह्या बरेच दिवस घोळणाऱ्या आणि नंतर सोयीने बाजूला सारलेल्या प्रश्नाचे मला काल एकदम उत्तर सापडलं..
...आईकडे गेले होते आणि माझे कपाट उघडले की जे अजूनही माझ्याआणि माझ्या बहिणीच्या वस्तू सांभाळून आहे..😊...निरुद्देश चाचपणी करत होते आणि खूप सुखावत होते... लहानपणी जमवलेली ग्रीटिंग कार्ड ,वाचन सौन्दर्य नावाच्या वहीत वाचलेल्या पुस्तकांमधल्या आवडलेल्या ओळी लिहायचे ती वही,माझे खेळ ,मातीची चूल ,हंडा अश्या कितीतरी गोष्टी.. ज्या आजपण आई आवरून ठेवते... आणि मला साने गुरुजींच्या गोड गोष्टींचे दहा भाग ,श्यामची आई ,चिंटू,जिम अँड लॅसी .... आणि अजून..😊अशी काही माझी खूप जास्त लाडकी पुस्तके सापडली ... बरीचशी पुस्तके आईने मागच्या शाळेत वाचनालयात दिली होती ... पण माझी खूप आवडती पुस्तके ज्यामागे छान आठवणी आहेत ... जी मी पण खूप जपायचे ती मात्र मी तिला घरीच ठेवायला लावली...
मी उत्साहाने लेकीला हाक मारली आणि दाखवले ही बघ .. गम्मत माझी पुस्तके .. माझी आवडती ... ती पण हरखून बघायला लागली आणि म्हणाली आई ,अजून ठेवली आहेत?
मी खूप उत्साहात सांगत होते ... बघ हे न मला माझ्या आजोबांनी .. म्हणजे तुझ्या पणजोबांनी दिली होती .. बघ कशी नीट आहेत अजून... हे चिंटू माझ्या बाबांनी मला पुण्याहून खास आणवले होते..बघ मी कशी नीट वापरलीयेत... नीट ठेवलीयेत
...आणि अचानक मला जाणवलं ... की ती पण खूप हरखून बघतेय... ठरलं हाच वारसा मी नक्की तिला देऊ शकेन...एक म्हणजे पुस्तकप्रेम ... वाचन वेड... आणि अजून म्हणजे जपणूक.सगळ्यांचीच
...आज्जीने तिच्या वेळ च्या मला दिलेल्या ठक्या ... म्हणजे बाहुल्या ... बाबा आजोबांनी दिलेली पुस्तकं... आई ,आत्त्यांच्या वेळची भातुकली... अश्या कितीतरी गोष्टि..ज्या मला त्यांनी मला वेळोवेळी सांगितलेल्या इतरही अनेक चांगल्या गोष्टींची आठवण करून देतात...माझ्यासाठी ती कदाचित प्रतीकं म्हणून साठवली गेलीयेत
प्रत्येकजण खूप काही देत गेले....आणि मी साठवत गेले...कदाचित त्यावेळी तंतोतंत वागायला जमले नसेल...पण आाज चांगल्या गोष्टींचा पाया नक्कीच भक्कम आहे.
आता मला समजलंय की मी नेमकं लेकीला काय आणि कसे सोपवायचय....त्यावेळी जपलेल्या, माझ्या माणसांनी मला दिलेल्या गोष्टींनीच माझा गोंधळ आणिप्रश्न सोडवलेआहेत
आणि ती पुस्तके बघून आई कुठल्या ग वस्तू साठवू म्हंजे मोठी झाले की मी पण असच बघेन? ह्या लेकीच्या प्रश्नाने आश्वस्थ नक्की केलंय की ...चला सुरुवात तर नक्कीच झालीय...जपणूकीची😊

Comments
Post a Comment