कपाट आवरताना आज कितीतरी गोष्टी सापडल्या .... दरवेळी ह्या वस्तू असायच्याच गेली अनेक वर्षे ...पण गडबडीत  आहेत तश्याच परत ठेऊन द्यायची ...😊आज मात्र एकेक वस्तू काढून बघितली ... आणि कुठून... कशी कधी मनाने फेरी मारली ...समजलं नाही ..मी अगदी रंगून गेले ...
छोट्या बहिणीने दिलेलं ग्रीटिंग ,कधी तरी लिहिलेला निबंधाचा कागद,मोगलीची  चित्रकलेची वही,शाळेतल्या  गृहापाठाच्या  वह्या, कवितेची पुस्तक,....अगदी प्रेमात पहिलं   मिळालेलं गुलाबाचे फुल...जुन्या हिशोबाच्या वह्या( ह्या सवयीचे क्रेडिट आजोबांना) रंग ,कात्रण डायऱ्या, आज्जीने विणलेला स्कार्फ वेगवेगळ्या...कित्तीतरी गोष्टी..
सर्टिफिकेट, किंवा प्रगतीपुस्तक याव्यतिरिक्त अगदी साध्या...वाटणाऱ्या...चढत्या आलेखाचा ठसा नसेल त्यावर पण होत जाणाऱ्या बदलांचा मात्र नक्की आहे...
ह्या वस्तू खूप जुन्या झाल्या आहेत,थोड्या फाटल्या  पण आहेत ...म्हणावे तर विशेष काही नाही... आवराआवर करताना आवर पटापट..सदरातल्या...
पण आज मात्र वाटलं की ह्या गोष्टी इतक्या जुन्या झाल्या आहेत ...ही पुस्तक वापरता वापरता ह्यात अन्नपूर्णा कधी सामील झालं.....आणि आता थोडे सरावल्यावर तेही तळातल्या कप्प्यात कधी ठेवलं गेलं समजलच नाही.😊
ह्या गोष्टी जेंव्हा रोजच्या असण्याचा भाग होत्या तेंव्हा असे वाटलंच नाही  की काही वर्षांनी त्या जुन्या होऊन परत सापडतील तेंव्हा त्यांचा वास जुना असेल पण आठवणी मात्र  ताज्या करून देतील...
सगळ्यांच्या मनात अश्या काही  खास आठवणी असतातच ज्या अश्या काही वस्तू बोलक्या करतात...
......आई, आज्जी, बाबा एकंदरीत घरातले सगळेच कपाट आवरताना इतके का रेंगाळायचे, त्यांच्या डोळ्यातली चमक आणि अस्पष्ट हसु त्याचा अर्थ आज समजतोय मला.😊

Comments

Popular posts from this blog

अन्नपूर्णेचा घास

फुगे

मेतकूट