Posts

Showing posts from June, 2020

#माझा_भाव_तुझे_चरणी

#माझा_भाव_तुझे_चरणी आंधळे लोचन....पांगुळे चरण....sssss  कुठूनश्या घरातून अभंगाचे स्वर ,कानी पडले,,,,,  आन् राघबाचं मन संध्याकाळच्या अंधारा सोबत मिटू मिटू  गेलं.. यंदा वारी न्हाई....आजवर कंदी आस झालं  न्हाई,, काय करावं..येळच ही अशी...गळ्यातली माळ घट्ट धरून,,  अंग चोरटं करून देवळासमोरच्या पारावर राघबा बसून राहिला... राघबा वsssss... आवो  रंगा  हुडकतोय तुमाला ,, डुट्टी  लागलिया,, जानार म्हनतोय...जावा घरला ... बाबल्याच्या  निरोपा मागोमाग राघबा घराकडं चालला.. रंगा,,,काय रं??निगालास व्हय?? हां... जायला लागतंय...ड्युटी लागलीय बंदोबस्ताची...  ती बी,,,तुझ्या  पंढरी जवळच.. आरं , काय किरपा म्हनायची,,, पांडुरंगाने च बोलावलं  रं तुला..आरं तुझ्या आज्याच्या आज्यापासून  ह्या घरात  वारी,, कधी चुकली न्हाय बघ...आन ह्यावर्षी हे असं... माझी आसच मिटली म्हनायची,,, तू इतक्या जवळ  जातूयास,,  पांडुरंग तुला भेटनार,, तु परत येशीला,,  तवा तुजच पाय धरीन...तवाच माऊली भेटंल... हि बी त्याचीच किरपा!!!! ,,, रंगा कातावला....विठ...

शारदा

#शारदा रेवती आठवडाभर पाहत होती...सारजा बाई ..तिच्या सासूबाई नेहमीपेक्षा उत्साही वाटत होत्या..अगदी मागच्या १०-१५ दिवसांपर्यंत,"कुठे जायचंय आता घाईने,, सगळे तर घरातूनच कामं करताय....आवरते निवांत"म्हणणाऱ्या...त्या सकाळी लगबगीने आवरून घेत होत्या..ठराविक वेळी हातात असणारी,जपमाळ सुद्धा क्वचित दिसत होती. तसं, त्यांनी योग्य वेळी वयोमानानुसार, कोठीच्या किल्ल्या  रेवतीकडे दिल्या होत्या,, तीही त्यांच्या विश्वासाला पात्रच ठरत होती,, सगळं घर जबाबदारी घेऊन उत्तम चालवत होती.. सारजाबाईंचा मुलगा जयंत..त्यांचा "राया" पुष्कळ शिकून,,  त्यांच्या भाषेत,, मोठ्ठा साहेब झाला होता. आईने आयुष्यभर उपसलेल्या कष्टाची  जाणीव जयंत ठेऊन होता.रेवती देखील त्यांना दुखावत नव्हती. सारजाबाईं, जयंत-रेवती आणि त्यांची मुलगी ओवी. छान फुलोरा  नांदत होता. "देता देवविता नेता नेवविता मनुष्याची सत्ता काय येथे" ह्याप्रमाणे सारजाबाई जे गेलं,, ते गेलं.. त्याची खन्त न करता,, जे आत्ता आहे त्या भाग्याच्या सुखात राहत होत्या. ह्यावर्षी...बाहेरच्या परिस्थितीमुळे,, ओवीची शाळा ऑनलाइन  होणार होती... पुस्त...