हातातल्या अक्षता पडल्या......शुभमंगल!!!!!!
प्रसन्न डोलणारी तुळस,, सुंदर सजवलेला बाळकृष्ण,,, मधला अंतरपाट,,, उदबत्यांचा घमघमाट,,, आवळ्यांवर लावलेल्या वाती,,, साखरफुटाणे, प्रसाद,,, उरलेले फटाके ,सगळं अगदी मनाजोगतं..
तरीही बेचैनी वाटली,,
संपली ,,
खऱ्या अर्थाने दिवाळी संपली,,, देवदिवाळी हे नुसतं मनाचे समाधान,,, पण अगदी खरं सांगायचं तर ह्या वर्षाची दिवाळी संपली.
गावाकडचं आपलं घर आता गोकुळ नसेल,आम्हा लेकिसुनांना देऊन तळ गाठलेले फराळाचे पदार्थ तू घे , मी घे करत तसेच तळाशी असतील.आकाशकंदील एकटा, जशी आनंदाशी फारकत व्हावी असा ,कसलीतरी वाट बघत असेल...
आणि हव्याहव्याश्या सुरुवातीचा नकोनकोसा शेवट ...निरोप,,,तो घेऊन आम्ही परत आलोय ..घरी म्हणावं का ह्याला?? का जॉब डेस्टिनेशन???
........
दार उघडताच इतके दिवसांच्या साठलेल्या पेपर चा ढीग पडला,, आत पाऊल टाकताक्षणी , उद्यापासून सुरू होणारं रुटीन आणि आत्तापासून करायच्या असलेल्या कामाची यादी तरळून गेली,,
सुखरूप पोचल्याचे फोन करायला हवे ,वाट बघत असणार घरी ,,दूध , फुलपुडा हे निरोप द्यायला हवे ,विरजण लावायला हवं, भाजी,राहिलेलं सामान आणावं का??
सगळं तर सरावल्यासारखं करतेय,, पण ,, लक्ष कुठेय ह्यात....
विचार करता करता घरून आणलेले फराळाचे डबे बाहेर काढले,, ऐवज तोच,, पण ह्याला कुठे आनंदाचा स्पर्श ही नाही ,, की "त्या"घराच्या उत्साहाचं उधाण नाही,,, सगळं गप्प.
घरी तर आले पण आपलं घर रिकामं करून आलेय,, आज्जी , आजोबा, बाबा ,अहो आणि अग आई,,,,माझ्या सारख्या लेकीं-सुनांना पण हेच सलतं बरं...
आता तर,आवडत्या गोष्टींनी गच्च भरलेला फ्रॉक चा खिसा रिकामा करावा तसं झालंय माझं,,
दिवाळीच्या आधीपासून चालू असलेलं प्लॅनिंग, भेटण्याचे वायदे, खरेदी, मनसुबे,,फोनाफोनी,, आणि मेसेजेस,,ह्यात भरभर सरकणारे दिवस,
प्रत्यक्ष फराळाच्या तयारीला लागल्यावर, आजेसासूबाईंचा, खळाळता उत्साह, दरवर्षी नव्याने त्यांच्याकडून शिकलेले चिरोटे जे अजूनही त्यांच्या आसपास म्हणता यावेत असेही जमत नाहीत,सगळ्यांचे हात आणि मनं सुद्धा एकत्र येऊन झक्कास झालेला फराळ,,
कौतुकाने , घातलेल न्हाणं,, नणंद -भावजयांचं सातमजली हसणं, दिर-जाऊ, भावंडांच्या गप्पा, भाचे, पुतणे, ह्यांचे खेळ,, लुटुपटू भांडणं,
लेकांचं कौतुक होईलच पण आम्ही सुना पण मुली होऊन राहतो ते घर, तिथेच खरी दिवाळी,,, जिथे गृहलक्ष्मीला अनेक हातांनी आशीर्वाद, मिळतो ती दिवाळी..
सासर- माहेर वेगळं न राहता एकत्र असणं,, सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं हसू ,समाधान हीच रोषणाई, आणि कौतुकभरली नजर हीच झळाळी,, हे साठवून मी आलेय,,
रांगोळीचं अंगण,, ओवाळणीची कुरवंडी, काढलेली दृष्ट, नटल्या मुरडलेल्या आम्ही,आमच्या हसण्यामुळे सुखावलेले तुम्ही,,, हे सगळं तिथल्यासारखं इथे नाही,, असूच शकत नाही,, सण साजरा होईलही पण जगता "त्या"च घरात येतो,,, आपल्या घरात,,,
करंज्या करताना आग्रहाने करंजीला मुरड घालायला लावलीत ना??? परत येण्यासाठी... यायलाच हवं,,,
"त्या"आपल्या घरात,, सुखाच्या सणांसाठी..आणि क्षणांसाठी सुद्धा,,, वाट बघतेय ,,, नेहमीसारखीच...
😊😊😊😊
आरती जोशी-ऋचा प्रभुणे

Comments
Post a Comment