काही दिवसांपूर्वी च ओपन डे नामक ,, सोहळा लेकीच्या शाळेत पार पडला,,,  निकाल असं   न म्हणता  हे छान बाळसेदार , शक्यतो मार्क कमी पडले तर "निक्काल" लागल्याचे दुःख वाटू नये असं गोंडस नाव सध्या दिलेलं  असत,,,
हे गोड गोजिर नाव असलं तरी जे व्हायचं तेच होत असत,, ह्या मनाच्या तयारीनेच मी गेले ,,  मार्क्स वगैरे ठीक  ठाक होते,,, आता शिक्षकांना भेटायची वेळ,,,
नेहमीच्या तक्रारी गेले अनेक वर्षं ऐकत असल्यामुळे,,
नवीनच स्वयंपाक शिकणार्या किंवा शिकणारी, ला फोडणी करताना , तेलात मोहरी  कधी टाकायची ह्याबाबतीत,,, जस अष्टावधान केंद्रित करावं लागतं ,, तसंच काहीसं वाटलं,जरी इतकं नाही तरी  कर्णेद्रियांची तयारी करून एकदम निरागस चेहऱ्याने मी  बाईंसमोर उभी राहिले,,,
चैत्राची आई ,, बाकी सगळं  छानच आहे , हुशार , चटपटीत आहे ,मदत करते,  लक्षात ठेवते छान,  (ह्या गुणवर्णना नंतर आता तक्रार काय हा प्रश्नच मला पडला नव्हता,,,)पण फार गप्पा मारते हो ,,, खूप बोलायला लागत ,, आणि अक्षर जरा वळणदार हवं अजून,,,
मी आपलं हो हो ,, मी सांगते ,,  करवून घेते ,तुम्हीही लक्ष ठेवा च ,, रागवत जा तिला ,, वगैरे नेहमीचीच वाक्य  बोलून निघाले.
घरी आल्यावर काय ग??काय गप्पा मारतेस ग,, इतकं काय बोलायचं असतं??अभ्यासाकडे लक्ष असतं की नाही??तोंड कस दुखत नाही???(इथे माझं मात्र दुखायला लागलेल असत  आता हे नमूद करायला हरकत नाही),,  मला दरवर्षी हेच ऐकायला मिळत ,, कानफाट्या नाव होईल बरं का!!मग गप्पा मारल्या नाहीस तरी तूच बोलतेस अस म्हणतील सगळे ,, गप्पा बंद ,,, आता,, अशी  कडक सुनावणी केली ,,,
तिने पण, अग , पण मी नव्हते काही ,,,मागची ना बोलवत होती ,, आणि  तेवढ्यात बाईं नि बघितलं ,,  त्यांना वाटलं मीच बोलतेय असली सारवा सारवीची कारण सांगितली,,,
लहानपणी ह्याच दोन कारणावरून माझ्या आईने ही अशीच कडक सुनावणी केलेल्या आठवणींमुळे ,,,आणि आता मात्र  सुवाच्य झालेल्या माझ्या अक्षराकडे पाहून .आणि बोलक्या स्वभावामुळे सगळीकडे सहज मिसळता आल्यामुळे कदाचित ,,, सहसंवेदना जाणवून रोज शुद्धलेखन आणि माफक ओरडणं,,,  ह्या सहानुभूती  च्या मार्गांचा मी  अवलंब केला .
काही दिवस गेले ,, आणि वही तपासताना  तिच्या मागे ,, 19 चा पाढा पाठ केलास?? मी घरी गेले की फोन करते,, खेळू या का आज?? काल  हा प्रोग्रॅम बघितलास का😱वगैरे वाक्य मला दिसली ,,, तिला विचारलं हे काय आता, तर म्हणे ऑफ पिरियड ला पण बोलू नका म्हणतात म्हणून मग  असें लिहून विचारते,,, गप्पांचं हे स्वरूप ,, मला माझ्या शाळेच्या दिवसात न नेईल तरच विशेष😂😂
सध्या च्या वेळेनुसार हा अतिशहाणपणा जरा लवकरच आलाय😏
पण तरीही आता आईच्या भूमिकेत असल्यामुळे  हे अस करतेस का ???वही ह्यासाठी देते का मी तुला?? हेच करतेस की अभ्यास पण करतेस,,, काय🙄ग??आता  परत हे दिसता कामा  नये,, वगैरे झालंच,,,
आणि थोड्याच दिवसात,, परत एकदा वहीच्या मागे ,😐ह्या चित्रासकट,,,(शु$$$)बोलू नको !!!आई मला  रागवलीय घरी,, इथे नको ,, बोलायला असं,, शाळा  सम्पली की खाली बोलू,,, ही वाक्य वाचताना ,,अगदी खरं सांगते हसू  आवरलं नाही ,,,
हे सगळं चूक आहेच ,,, पण इतकं पावलावर पाऊल पडताना बघून ,,, दुनिया गोल है, इथे केलेलं इथेच फेडावं लागत,,तू  मोठी झालीस ना की समजेल तुला वगैरे आठवायला लागलं ...
जनरेशन गॅप वगैरे अंधश्रद्धा आहेत,, काही गोष्टींच्या बाबतीत हे असंच चालू  राहणार ,,  आई -मुलांचे हे असेच  चुकांचे आणि दटावणीचे संवाद सुरूच राहणार ,,, त्याशिवाय  कालचा किस्सा आजची आठवण कशी होणार??
 ,,, हे सगळं माझी आई ,, आणि माझी मैत्रीण ह्यांच्या पर्यन्त पोचवलंच मी ,,, आठवतंय ना हे विचारण्यातली गम्मत,,, आणि कळतंय ना आता !!!हे ऐकण्यातली ही   जाणीव ,,, ह्या आठवणीं ना मोल नाहीये.
 आरती जोशी-ऋचा प्रभुणे.

Comments

Popular posts from this blog

अन्नपूर्णेचा घास

फुगे

मेतकूट