किमया हो किमयाच ... खूप प्रश्न पडत होते सध्या सारखेच... उगाचच..काही एकमेकांशी संलग्न ... काही प्रश्न पूर्णपणे वेगळे पण पाठोपाठ मनात अक्षरशः घुमणारे... नात्यांसबंधी .. बदलणाऱ्या परिस्थिती संदर्भात... आणि बरेच वगैरे .. पण असे कसे . का.....असे काही.... पण असा एखादा क्षण येतो की काहीही न बोलता सगळ्या अगदी वेगवेगळ्या असणाऱ्या प्रश्नांना एकदम सहज उत्तर मिळून जाते.... ही किमया एक तर निसर्ग करतो न दुसरे म्हणजे सगळ्यात जवळच आपलं नाते... हूल देऊन कंटाळलेला पाऊस एकदमच पडायला लागला .. मी अगदी सहज हात खिडकीतून बाहेर काढून पावसात धरला ... मूड का काय तो जरा ऑफ च होता ... पण बर वाटत होते.... आणि तेवढ्यात मागून माझ्याच हातावर हात ठेवले माझ्या लेकीने .. माझ्याबरोबर माझ्यासारखच .. पाऊस बघायला ... तिलाही माझ्यासारखच वाटत होते... बरं ... आणि मी पण असा पाऊस तिच्या बरोबर बघत असल्यामुळे अजून छान... मस्त वाटतंय ना आयुली... आणि बस्स तिथेच सगळे प्रश्न ... गोंधळ .. सगळं संपले... आणि अकारण मनाला आलेली खिन्नता .. होती की नाही अस वाटावे इतक नवीन वाटले ... माझ्यासारखी असणारी .. माझ्...
Posts
Showing posts from June, 2017
साठवण
- Get link
- X
- Other Apps
आपल्या समोर असे काही छोटे प्रसंग घडतात किंवा घडत असतात ... की कायम आठवणींमध्ये राहतात आपोआप... त्यातून खूप काही साठवण होते की जी जेंव्हा जेंव्हा आठवू तेंव्हा अधिकाधिक आनंद च देते .... मला आठवतय माझी आज्जी ताक घुसळायला घ्यायची तेंव्हा नेमक्या मला श्रीकृष्णाच्या लोण्याच्या गोष्टी दुधाच्या घागरी वगैरे आठवायच्या आणि लोणी काढायच्या वेळेला मी तिथे ठाणच मांडायची आणि शिरस्त्याप्रमाणे लोण्याचा गोळा हातावर मिळायचा आज्जी म्हणायची कृष्णच आहे... पण अजून हवय म्हणले की ती सांगायच ी अग सगळे लोणी आजच संपवलं तर तूप कस कढवणार ... ते पण हवं ना माझ्या मनात आपला विचार आज्जी टीव्ही बघत नाही का फ्रेश आणि हेल्दी तूप विकत आणायचं ना सोप्पंय... पण हा विचार मनातच ठेऊन शहाण्या सारखी ऐकायची मी... त्यावेळी वाटायचं आपल्याला हे ताक करायला मिळेल तेंव्हा यथेच्छ ताव मारायचा तुपा बिपाची काळजी करायची नाही काही वर्षांनी लग्न झालं आणि सासरी पण आजेसासूबाईंना ताक करताना बघून लहानपणीचा गमतीचा विचार आल्याशिवाय राहिला नाही हे ताक करण्याचे काम ह्या आज्याच कसे काय करतात बुवा असो त्याहीवेळी पणतिच्या...