Posts

Showing posts from November, 2019
#AD_सहजच मनातलं समीकरण(÷+×-)=???? आई मला नाही ग जमणार!!!तुझं सगळं आयुष्य साधं फिक्कट जगण्यात आणि 'मॅनेज'करण्यात गेलं,,, मला नकोय तसं,, भरपूर पैसा, उच्च राहणीमान ,, कसलीही चिंता नाही हेच  माझ्या आयुष्याचं समीकरण आहे...आणि त्यासाठी ही भरपूर पगाराची नोकरी....हीच त्याची एकमेव बाजू आहे... बाळा, नोकरी जरूर कर... घेतलेल्या शिक्षणाचा, बुद्धीचा वापर जरूर व्हावा ,स्त्रीला आर्थिक  स्वातंत्र्य जरूर असावं,,पण त्यासाठी आयुष्यात किती गोष्टींशी तडजोड??घरातल्या अन्नाचा  समाधानी घास नाही की गरज असताना मुलांना आईचा सहवास नाही.. सतत कामाचा ताण घेऊन तुझं वावरणं,,स्वस्थ बसणं सोड..शांत तरी असतेस का तू आतून?? आणि गरजा , राहणीमान ही समीकरणाची डावी बाजू तुझा अमाप पैसा तरी संतुलित करतोय का,,, ??ती बाजू फुगतच चाललीय..पैश्याचा ओघही त्याचा पाठलाग करतोय..आणि संकोच फकत तुझा होतोय...ओढाताण तुझी होतेय, आणि फरफट पर्यायाने सर्वांचीच...  हे 'मॅनेज' करणं नाहीये???सुदैवाने नवरा सर्वतोपरी मदत करणारा, आणि समजून घेणारा आहे..कुठं आणि कधी थोडं थांबायचं तू ठरव.. मी केलं मॅनेज तुझ्या म्हणण्यानुसार,,, मनाला...

अन्नपूर्णेचा घास

#AD_लघुकथा अन्नपूर्णेचा घास नुकतंच लग्न झालेली..नवी नवरी ती...घरात आजेसासूबाई, सासूबाई, जाऊ नणंद अश्या  स्त्री राज्य असलेल्या भरल्या घरात आलेली,,स्वयंपाकघरातला तिचा पहिलाच दिवस, एकाहून एक सुगरण हातांनी तृप्त झालेली   त्या घरातली अन्नपूर्णा आज हिच्या हाताची चव बघणार होती,, हिच्या मनात धास्ती,, पहिलं कौतुक वगैरे ठीक आहे पण त्यांच्यासारखं नाही च जमलं तर???फजिती ग बाई अगदी!!!! तिला येणारा थोडा फार स्वयंपाक नावाप्रमाणेच ,,   फार येतंय अस वाटताना थोडाच जमणारा असा, आजी- आई घरी  असताना शेलकं काम करणारी ती ,,आज ही परीक्षा अंगावर आली तिच्या.... तुम्ही थांबा ना  इथे,, मला सांगा ,, ती सासूबाईंना म्हणाली,,  मनातलं ओळ्खल्यासारखं,, त्या म्हणल्या, अग कर,, काही चुकत नाही,,, इकडे शेगडी ला हळदकुंकू वहायचं... देवघरात अन्नपूर्णेला नमस्कार करायचा, आणि सुरुवात करायची,, काही अडलं तर आहेच मी. आम्ही कुठे आभाळातून पडलो??करता करता येतं अग,, येईल हो!!!एक दिवस तरबेज होशील बघच, आपल्या घरात अन्नपूर्णेचा हात आहे अगदी डोक्यावर सगळ्यांच्या... *सगळ्यांच्या*....तिच्या मनात तो श...