अश्वत्थ
गाभाऱ्यात नंदादीप.…दीपमाळ प्रांगणात तेज-प्रकाश सोहळा...भेद फकत बहिरंगात। आत उजळे त्रिपुर....नाश त्रिविध तापाचा। मांगल्याचे ते वलय....वेढा सुटे संशयाचा। द्वैताद्वैताचा कल्लोळ....विरे कापरासारखा। जीव-शिवाला भेटता..राहे प्राण का पारखा? आता शाश्वत अश्वत्थ....दीप्ती सहस्ररश्मीची। शुभ्र तेजाने झरते...आभा दृढ स्थिरतेची।। आरती जोशी-ऋचा प्रभुणे