#चन्द्र_आहे_साक्षीला शरद रावांचं सहस्त्रचन्द्र दर्शन करण्याचा ठराव कुटुंबात अर्थातच, एकमताने झाला,, तेंव्हाच शरद रावांनी अट घातली,हा कार्यक्रम आप्तेष्टांच्या सहवासात,, छोटेखानीच करायचा....मुहूर्त ही त्यांनीच ठरवला,, शुभवेळ बघण्याची गरजच नव्हती... कोजागिरी पौर्णिमा.. संध्याकाळी ,, गच्चीत,, गप्पागोष्टींच्या साथीत अनौपचारिक सोहळा. ठरलं...अगदी नक्की.. असंच होणार... शरद रावांच्या मनासारखं... उत्साहाच्या, ठरवाठरवी च्या लाटेवर स्वार दिवस,, झुळके सरशी निघून गेले,,, आणि तो दिवस उजाडला.. शरदराव अगदी वाट बघत होते,,, दिवसापेक्षा,, संध्याकाळची,, आणि त्यामागोमाग येणाऱ्या पौर्णिमेची...पूर्ण चंद्राची रात्र.. त्या दिवशी ते सतत कपाटाजवळ जाऊन चाचपणी करत असल्याचं श्यामल ताईंच्या नजरेतून निसटलं नव्हतं... काय चाललंय??ह्या भुवयांनी विचारलेल्या प्रश्नाला,, कुठे काय??काहीच नाही,, हे उत्तर डोळे मिचकावून मिळालं होतं.. आणि ती वेळ आलीच,,, मुलं-बाळं ,, नातवंड-पतवंड बहिणी, जावई, साडु-मेव्हणे ह्यांनी भरलेलं घर,,,,आणि,,, शरदरावांनी श्यामल ताईंना हाक मारली,, अहो,, मं...