गेल्या काही दिवसात ,व्हॅलेंटाईन वीक चे वारं जोरदार वाहतंय ,,, अगदी गुलाबी वगैरे,,,रोझ डे , चॉकलेट डे, प्रॉमिस डे , टेडी डे , हग डे,,, वगैरे च अगदी उत्साही वारं,,,
लग्नाला बऱ्यापैकी वर्षे झालेली, तसं तरुणच असलेलं मन जरा नवतरुण वगैरे होण्याच्या प्रयत्नात ,,,मी आपली रोजच्या डे च्या कौतुकानुसार , रोझ (डे) दे ,चॉकलेट(डे)दे,,, टेडी(डे)दे प्रॉमिस(डे)...देच,,, असलं काहीही न म्हणता आपण होऊन मिळतंय का ह्या प्रतीक्षेत होते.
नवीन,नवीन लग्न ठरल्यावर घरातून , गजरा घेऊन दे ,अस सांगून पाठवल्यावर,,शेवंतीची वेणी घेऊन भेटायला येणारा ,,, माझा "अहो"आता सणासुदीला, काही विशेष प्रसंगी(तेही , भारतीय पोशाख आहे हे लक्षात घेतल्यावरच),,, गजराच घेऊन येण्या इतपत सुधारित झाला आहे,, त्यामुळे हे असले "डेज "वगैरे लक्षात ठेवून काही आणेल हा माझा भ्रम च खरा ठरला.
व्हॅलेंटाईन ची पूर्व संध्या,, कोणताही डे साजरा न होता नेहमीसारखीच ,,, ट्रॅफिक मधून आल्यावर ,, सोफ्यावर हुश्श होत ,, अहो म्हणाले,,, काय गर्दी आहे सगळीकडे ,, सगळे रस्ते बजबजलेले,, त्या व्हॅलेंटाईन डे मुले सगळ्या केक च्या दुकानात गर्दी,,, (माझ्या अपेक्षांना धुगधुगी)
मला एक कळत नाही,,,, जर चोरी छुपे मामला असेल , आणि उभय व्हॅलेन्टाईनच्या घरी माहीत नसेल ,, तर इतका मोठा केक घेऊन ,, काय करायचंय,,, खाणार दोघच,, तो तरी किती??? उरलेला ना घरी नेता येणार ,, ना कोणाला देता येणार(स्पेशल की काय असतो ना )त्यापेक्षा पेस्ट्री च घ्यावी ,,
आणि बायकोच व्हॅलेंटाईन असेल,,, तर फकत केक वर भागणार नाहीच ,,, त्यापेक्षा स्वयंपाकाला सुट्टी देऊन,, केक ऐवजी डेट वर नेलं तर बरं,, नाही का...
🙄हे लग्नानंतरचे अति व्यावहारिक विचार ऐकून मी पार खलास झाले ,,, आणि हाच का तो ,,,,(व्हॅलेंटाईन???)हा प्रश्न मनातच ठेऊन कामाला लागले,,,,
थोड्याच वेळात दोन टप्पोरी गुलाबाची फुलं ,, तीही बदामाच्या कागदात गुंडाळलेली,, माझ्या समोर धरून, नवरोबा म्हणला,,, घे तुझ्यासाठी आणलीयेत,,,, अजून दोन तासांनी देणार होतो ,, पण ताजी आहेत म्हणून आत्ताच देतो,,,😊😊(ह्यावेळी ताजी भाजी ह्याने बिनचूक आणल्यानंतर मनात जे सुखी भाव येतात तेच चेहऱ्यावर झळकले)आणि कळी खुलली,,, तरीच आज उशीर झाला असच काहीसं म्हणत असतानाच,,, मनात आलंच ,,, हाच ग बाई तो माझा भोळा व्हॅलेन्टाईन ,,, हाच तो...
आयुष्य बदामी सुंदर आहे ,,, फकत,,,,,, नवरा (व्हॅलेंटाईन साठी ही) हौशी असला पाहिजे😂😂😂
प्रेमदिनाच्या शुभेच्छा,,,, हॅप्पी व्हॅलेंटाईन♥😍
आरती जोशी-ऋचा प्रभुणे.

Comments
Post a Comment