#नथ#anandigopal#firstindianladydoctor#proudwoman#pride
सध्या ह्या चित्रपटाच्या निमित्ताने सुंदर हाताळलेला विषय , त्यांची कर्तबगारी आणि ह्याचबरोबर त्यांची नथ सर्वत्र झळकतेय .ह्या वेळी माझी ही खास आठवण अशी सांगण्याचा मोह आवरत नाही.....
माझ्या "बाबांची" नथ😊
रुळे मोतीयांचा घोस लडिवाळ ओठांवर।
त्याची खुमारी बाई ग ,ओसंडते मनभर।।
असा अडसर गोड ,गुज सांगता येईना।
कशी लपवू खुशीची लकेर ती कळेना।।
हवासाच होता ,सोन्या मोत्याचा हा डौल।
जाणत्या मनाने क्षणी  ओळखला  कौल।।
थाट नकोच उणा,इच्छा  बापाच्या मनीची।
लाड पुरवू पाहे तो ,भेट देऊन नथीची।।
असा दिमाख तिचा, खास किती ती झाली गं।
मन ओळखीची खूण मनाजवळ राहिली गं।।

नथ,,परंपरा सांभाळणार्या हिचं गारुड,,, अनेक शतकं टिकून आहे,, नव्हे तसूभरही कमी झालेलं नाही.
मराठी म्हणलं की नथ अनिवार्य,,पाणीदार मोत्यांची, माणकाची साजेशी साथ, सोन्याची गुंफण ,तिचा बाकदार आकडा , लोंबता घोस,,,सगळंच कस रेखीव❤
 मान, उठाव, रेखीवपणा,ठसठशीत सौन्दर्य, मूर्तिमंत सोज्वळपणा,, ही सगळी विशेषणं मिरवणारी,, भारदस्त सम्राज्ञी आहे ही.
मला आठवतंय राऊ मधल्या रमाबाईची  नथ बघितल्यापासून च नथ हवीच ,, ही जादू पसरली होती मनात,,,  ती कधी कमीच झाली नाही,,, लहानपणी सुद्धा मोठी झाल्यावर नथ घालता येईल ह्याच आशेवर बहुधा मी नाक टोचून घेतलं असावं.
आधीपासूनच आवडणारी ही ,, आता म्हणजे  कहर जवळची आहे,,, कारणही तसंच,,,,
 माझं लग्न ठरलं,,,  ठराविक वळणाने खरेदी दागिन्यांपर्यंत येऊन पोचली,, मंगळसूत्र, नेकलेस, पाटल्या -बिल्वर,पोहेहार का राणी हार का चपला हार, झुबे ,अंगठी,,, ह्या चर्चा चालू असताना माझं सगळं लक्ष फकत तिच्यावर होतं,,,, नथ❤सुंदर होती ,, समोरच ,,, अगदी हवी तशीच,,, राहून राहून नजर जातच होती,काही कारणाने लहानपणी टोचलेलं नाक बुजून गेलं,,, मनात विचार आला छे,,, आता कसली नथ घालता येतेय,,, चांगली टपटपित,, ओठांपर्यंत येणारी,,, अगदी रमाबाईसारखी,,
अहो आजी म्हणल्या ,,नाक टोचून घेतेस का??छान घसघशीत नथ आहे माझी  ,,, तू घाल,,,  धीरच नाही झाला.
काही न बोलता घरी आले,,, मनात रेंगाळत होतीच ती,,, बाबांनी विचारलं,, आवडलं ना सगळं??मनासारखी झाली ना खरेदी??  मीही हो म्हणलं..
 काही दिवसांनी सगळं मिळालं सुद्धा,,, ग्रहमखाचा दिवस,,, घरचा आहेर आणा, गुरुजींनी सांगितलं,,,आणि बाबांनी  माझ्या हातावर एक डबी ठेवली ,,, उघडून बघते तर तीच,,,ती ,,,नथ,,, खुश खुश खुश एकदम...
हवीच होती ना??म्हणून काल च आणली होती,,चापाची आहे ,,बघ आवडली का?? ह्या शब्दांनी  डोळ्यात जे वाटलं ,, ते होमाच्या धुरात लपलं गेलं,,, पण कायमसाठी कोरलं मात्र जरूर गेलं,, सासरच्या वाटेवर माहेरची ही खास आठवण,, न सांगता मनातलं ओळखलेली😊😇 फारसं न बोलणाऱ्या बाबांनी हे ही फारसं न बोलताच केलं,,,
प्रत्येकीच्या जवळची असलेली नथ ,, ही माझ्या आईची, माझ्या आजीची ,सासूबाईंची,,, अश्या स्वरूपात साठवलेली असते,,, माझं मात्र वेगळं आहे,,,
माझी नथ  मात्र माझ्या "बाबांची" आहे.
आरती जोशी-ऋचा प्रभुणे.

Comments

Popular posts from this blog

अन्नपूर्णेचा घास

फुगे

मेतकूट