कृष्णमोह

 #कृष्णमोह


होई राधा कृष्णमय

झाली मीराही त्याची...

रुक्मिणीचा जीवसखा

श्वास- लय  मोहनाची...


झाले तन्मय श्रीरंगी

रूप  धरता तयाचे...

एक ठाव घननीळ

स्वस्वरूप माधवाचे...

    

आस होते युगन्धरा

चित्ती एकरूप डोह...

त्यात सामावूनी उरे

मनी...कृष्णाचाच मोह...

 

आरती जोशी-ऋचा प्रभुणे

Comments

Popular posts from this blog

अन्नपूर्णेचा घास

फुगे

मेतकूट