नांव

 अलक- #नांव 


एकत्र राहता,, म्हणजे  काही आमच्या प्रेमासाठी नाही!!! ह्याला बाहेर  नोकरी कुठे मिळणारे....झेपायला तर हवं.. ते होणार नाही हे माहितीय तुम्हालाही,,,,म्हणून राहताय एकत्र...हे ऐकलं आणि.....

"त्याच्या-तिच्या" डोळ्यात पाणी तरळलं,, त्यांच्या  आपलेपणाचा असा हिशोब मांडला गेल्यावर...

 घरातून बाहेर पडताना,, करून दाखवेन नाहीतर,, "नांव" नाही लावणार... असं म्हणून डोळ्यातलं पाणी खसखसून पुसलं होतं त्याने,,,

 आज,,, स्वतःच्या घराच्या दारावर  सम्पूर्ण नावाची पाटी लावताना,, परत एकदा  पाणी तरळलं..त्याने परत एकदा पुसलं...

आणि तिने मात्र वाहू दिलं..ओसंडून वाहणं गरजेचंच होतं.

दळणाच्या डब्यापासून,, ते  नैवेद्याच्या घसघशीत चांदीच्या वाटीपर्यंत,, "त्याचं" नाव कोरून घेण्याचा हा, आठवणींचा "प्रवास" असाच पुसणं तिला चालणार नव्हतं😊

आरती जोशी-ऋचा प्रभुणे

फोटो सौजन्य: साभार गुगल

Comments

Popular posts from this blog

अन्नपूर्णेचा घास

फुगे

मेतकूट