सडा

 सडा कालचा आठवे

जुई हसे वेलीवर...

भरे ओंजळ तरीही

सांडू  जाते  भुईवर...


क्षण आजचा देखणा

परी..विसरू कसे ते...

मातीशीच जुळणारे

माझे  कायमचे  नाते...


मन  करी धडपड

रेघ  कश्याची सांधाया...

"आज" येई पकडीत

लागे "काल" निसटाया...।


श्वास भरुन घे गन्ध

ठेव जपून आठव...

जाता ओलांडून उरे

मागे शाश्वत साकव...


आरती जोशी-ऋचा प्रभुणे

Comments

Popular posts from this blog

अन्नपूर्णेचा घास

फुगे

मेतकूट