कारण_ती_मोठी_होतेय
#कारण_ती_मोठी_होतेय
श्रावणातल्या पहिल्याच शुक्रवारची सकाळची गडबड सम्पली होती. दुपारची सुस्त वेळ,, एकदम सरसरून आलेल्या पावसानं, अजूनच मोहक झाली होती.
नेत्रा, सवयीप्रमाणे,, बैठकीच्या खोलीला लागूनच असलेल्या,पॅसेज मध्ये, झोपाळ्यावर बसली होती.मंद हलणाऱ्या झोपाळ्याच्या लयीत,, तिला एकदम आठवलं,, उद्या नागपंचमी...
मनाचा वेग तो काय...😊😊
थेट,,, परकर-पोलक्यातल्या वयापर्यंत घेऊन गेला, तिला....पितळ्याच्या कड्या असलेल्या पाटावर,,, हळद-चंदनाने काढलेले नाग, नागकुळं... पूजा,, दूध लाह्यांचा नैवेद्य,,, आघाड्याची पत्री...जायफळ घातलेल्या पुरणाच्या दिंडीचा खरपूस वास...
शिकेकाई नागरमोथ्याचा गन्ध..सायलीचा गजरा...
हातावर मेंदी, खुळखुळ बांगड्या,, लोम्बते डुल , छुमछुम पैंजण,, रेशमी परकर पोलकं... आणि बाबांनी बांधून दिलेले झोके ,देवळात रंगणारे खेळ ,फुगड्या,, दिंड्या,,
.....
माहेरची ही बाई राजसखणी
सखुबाई घालते सागरवेणी...
सागरवेणीचा दिमाख तर पहा
कौतुक बघायला साऱ्या सया
सोडू नको सईबाई ,, आपली जोडी
पकव्याने रंगव,, घुमदार फुगडी
.....
ह्या बरोबर रंगलेली मैत्रिणींची फुगडी,,झोके
आनंदी चेहरे...
काय आणि कित्ती आठवायचं..
बरंच काही बदलत गेलं...पण सगळंच नाही,, अजूनही,, काही गोष्टी तश्याच आहेत की,,,
नेत्राने ,, पाय लावून झोका थांबवला😊..
तेवढयात ,,, आईssssss.. म्हणून रुणझुणत समोर नेहा उभी राहिली...
आई, ,, रात्री लक्षात आहे ना,, मेंदी काढायचीय आपल्याला...तू काढशील ना माझ्या हातावर??मला माझ्या मैत्रिणींना दाखवायचीय,,, आमचं ठरलंय,,, बाहेर नाही जाता येत, पण आम्ही व्हिडीओ कॉल करणार आहोत..
आई ,,, तू साडी नेसवून दे की मला,,, मज्जा उद्या... म्हणून नाचत नाचत नेहा पसार...
"ह्या मैनेच्या हौसेला,, प्रमाण नाही काही"..नेत्रा हसत हसत उठली...
दुसऱ्या दिवशीची तयारी, दुपारचे विचार,आईबाबांची आठवण,, ह्या त्रिवेणीत ,, तिची संध्याकाळ निघून गेली...
सगळी काम आवरून,, दोघीजणी,, जामानिमा करून मेंदी काढायला बसल्या...
आई ,, कोपरापर्यंत काढ,हं...आणि पायांवर पण थोडी...
मायलेकीच्या सोहळ्यात,, तेवढ्यात नचिकेत दाखल झाला,,, बाबा,, आई मला मेंदी काढतेय,, भरपूर काढणारे ,, मोठ्ठी एकदम..वैशुताईच्या लग्नात काढली होती ना तिनं तशी...
जेवण ,, झालंय ना तुझं??नाहीतर मग तू जेवणार कशी??त्याने विचारलं...
हो,, रे मी जेवलीय,, आणि लागलीच परत भूक,, तर तू भरवशील च की😁 ,, हो न बाबू?? इति लाडाच्या लेकीबाई .
झोपाळलेली असून ही नेत्राने ,, सुरेख मेंदी काढून दिली,, अगदी नेहाचं मन भरेपर्यंत...स्वतःच्याही हातावर ,, निमित्ता पुरती छोटीशी काढली.
नेहा अगदी खुश झाली होती,,
केवढी ती तयारी!!!! किती ती हौस!! इतकं काय ते....नचिकेत म्हणाला..
अरे मुलींना निमित्त च पुरतं,, असच असतं,, असू दे ...स्वतःच्या हातावरची छोटीशी मेंदी दाखवत ती मिश्किलपणे त्याला म्हणाली,, बघ हं , नंतर हौस इतकीच उमटते..करून घेऊ दे आत्ताच..
दुसऱ्या दिवशी,, सक्काळी उठल्या उठल्या,, नेहा ने रंगलेली मेंदी हात पुढे करून दाखवली... बाबा बघ...मस्तय ना...???
हं ....छान छान!!...नचिकेत चुळबुळत इतकंच म्हणला.
तोंडभरून कौतुक न केल्याने, नेहा जरा खट्टू च झाली.
नेत्राचा, स्वयंपाक, पूजा,, नैवेद्य झाला, जेवणं झाली.
थोड्याश्या कलत्या दुपारी,, नेहाला साडी नेसवून झाली...
नटून थटून लेक, तय्यार झाली,,,, नेत्राने कौतुकाने बघितलं..
थांब हं,, मी बाबाला दाखवून येते,, म्हणत,, नेहा लगबगीने साडी आवरत गेली..
बाबा,,, हे बघ..... मी कशी दिसतेय...
नचिकेत ने वळून बघितलं,,,
अरे,, मस्त एकदम,, छान दिसतेय,, सोनू माझी...अस काहीसं दाखवणारे भाव चेहऱ्यावर,, पण ...काहीतरी वेगळं च झालं..
छान छान.. छानच दिसतेय,, पण आता पुरे जरा नट्टा पट्टा..
बाबा च हे वाक्य ऐकून,, नेहा चांगलीच हिरमुसली...कस शक्यय??बाबा नि कौतुक पण नीट नाही केलं,, साधं....
ती निघून गेली... थोड्याच वेळात मैत्रिणींचा ,, खिदळता व्हिडीओ कॉल चालू झाला.
नचिकेत झोपाळ्यावर बसला होता,,, नेत्रा ने हळूच शेजारी बसत,, त्याला विचारलं...काय झालंय तुला? आज सकाळपासून...काल रात्रीपासूनच???... तू नेहाचा कित्ती लाडका आहेस,, एक गोष्ट ही तुला दाखवून झाल्या शिवाय तिला चैन पडत नाही.किती हौसेनं ,, दाखवतेय ती तुला,, कालपासून..आणि तू..असा का??नचिकेत...नेहा मोठी होतेय अरे,, अडनिडं वय आहे,, कॉलेज मध्ये जाईल दोन वर्षात आता..छोट्या छोट्या गोष्टी लागतात कधी एकदम मनाला,, ह्या वयात....
इतका वेळ फकत ऐकत असणारा, नचिकेत,, एकदम म्हणाला,,,, ती मोठी होतेय,, तेच तर ना...
काल तिच्या कोपरापर्यंतची मेंदी,, मी भरवणं,, लांब सडक केसांची वेणी,,, ती साडी...
कालपासून हे बघून बघून,, उगाचच हैराण झालोय मी,, हैराण पेक्षाही अस्वस्थ...
तुला समजतंय ना??मी काय म्हणतोय???
तुला आठवतं??तिला पहिल्यांदा पंजावी ड्रेस घेतला तेंव्हा,,, ती अडीच तीन वर्षां ची होती...ओंनी ओंनी,, करत दुकानात धावत सुटली.. त्यावेळी फ्रॉक मधून ड्रेस मध्ये ती आली तरी...मी खूप खुश झालो होतो,, पण आता मात्र ही साडीचा पदर हेलकावत येते,, तेंव्हा,, मी अज्जिबात खुश नाहीये..खरचंच!!!
ती अडनिड्या वयात आहे ना??माझंही तसच झालंय ,,मीही अडनिड्या वयात आहे,, धड लहान नाही, धड म्हातारा नाही, धड मोठा नाही असं काहीतरी ....
,,,तिचे कपडे गुढघ्यापासून दोन बोटं वर गेले तरी मला हुरहूर आहे आणि सम्पूर्ण साडी नेसली,, तरीही मला हुरहूरच आहे... तुला समजतंय ना??मला काय म्हणायचंय??
ही काही वर्षे भुर्रकन गेली,, आणि ती पटकन एवढी मोठी झाली म्हणजे???पुढे काय??? त्याचा गळा भरून आला,, आवाज घोगरा झाला...
काहीतरी विषय बदलत तो म्हणाला,, तुम्हाला बोलणं दिसतं,,, पण काय वाटतं,, कसं कळणार??
"नचि..." अरे,,, असं म्हणेपर्यंत तो उठून गेला.
नेत्रा मनात,, म्हणाली,,
खरचच,, मला कसं कळेल?? बरोबर आहे तुझं...आई ती वेळ स्वीकारून टाकते,,, बाबा मात्र....
तिला आठवलं,,,धाकट्या बहिणीच्या लग्नाच्या वेळी,, तिची गाडी नजरे आड होताच,,, आत येऊन ,, मोठ्ठे हुंदके देऊन रडणारे तिचे बाबा,,, त्याचवेळी समजून गेलं,, की आपल्यालाही ,,पाठवणीच्या वेळी नीट रहा,, सांगताना,, त्यांना इतकी घाई का होती...
भोगी,, नागपंचमी,, गौरी ,, सवाष्ण भोजन..ह्या निमित्ताने,, माहेरी गेल्यावर,, दुरूनच न्याहाळणारे,, बायकांच्या कार्यक्रमात ही , लांब उभे राहून पण हजर असणारे,आणि फोनवर आईशी बोलत असताना ही सतत येरझाऱ्या,, घालून मधूनच मागून मागून काहीतरी बोलणारे बाबा....
तिने हलकेच पायाचा रेटा देऊन झोका हलता केला... हा झोका आजच्या दिवशी तर विशेष आठवतो आम्हा मुलींना... तुम्ही ही झुलत असाल ..हे आज बघतेय मी....हा हिंदोळा तर असाच होत राहणार अरे...जागा आणि माणूस फकत बदलणार...चालायचंच...
अडनिडं वय आहे.. आपलंही.. आणि तिचंही
मला समजतंय... बरंच काही बदलत गेलं... पण सगळंच नाही... काही गोष्टी तश्याच आहेत की...
तुला आता कुठलंही निमित्त पुरतंय...तू अगदी हळवा झालायस....
कारण....कारण ती...मोठी होतेय ना.☺
आरती जोशी-ऋचा प्रभुणे.
फोटो सौजन्य:गुगल
Comments
Post a Comment