स्मरणी

स्मरणी म्हणे  नाम घेतले,जे मणी स्पर्शोन पुढे गेले ।

विसर्जो म्हणू अधिक झाले"मी"पण, नाम न स्पर्शिल्याने।।


आरंभ-अंताचे  व्यवधान,आवर्तनांचीही ठेविता जाण ।

 तरी,मग कैसे  हरवेल भान, व्यवहारे सर्व व्यापता असे ।।


ज्याचे स्वरूप न ये मापता,ऐसा चिदानंद शोधो जाता । संचयाची कास नको आता,  अमेय तीच अनुभूती जाण ।।


स्मरणीइतुके मूक  नाही,नाही स्मरणीसम  बोलके काही ।

आत्मसुखाची हीच ग्वाही,अंतःकरण "नाम" जपो आता।।


आरती जोशी-ऋचा प्रभुणे

Comments