अश्वत्थ

 गाभाऱ्यात नंदादीप.…दीपमाळ प्रांगणात 

तेज-प्रकाश सोहळा...भेद फकत बहिरंगात।


आत उजळे त्रिपुर....नाश त्रिविध तापाचा।

मांगल्याचे ते वलय....वेढा सुटे संशयाचा।


द्वैताद्वैताचा कल्लोळ....विरे कापरासारखा।

जीव-शिवाला भेटता..राहे प्राण का पारखा?


 आता शाश्वत अश्वत्थ....दीप्ती सहस्ररश्मीची।

 शुभ्र तेजाने झरते...आभा दृढ स्थिरतेची।।


आरती जोशी-ऋचा प्रभुणे

 

 
















Comments

Popular posts from this blog

अन्नपूर्णेचा घास

फुगे

मेतकूट