#माझा_भाव_तुझे_चरणी
#माझा_भाव_तुझे_चरणी
आंधळे लोचन....पांगुळे चरण....sssss कुठूनश्या घरातून अभंगाचे स्वर ,कानी पडले,,,,,
आन् राघबाचं मन संध्याकाळच्या अंधारा सोबत मिटू मिटू गेलं..
यंदा वारी न्हाई....आजवर कंदी आस झालं न्हाई,, काय करावं..येळच ही अशी...गळ्यातली माळ घट्ट धरून,, अंग चोरटं करून देवळासमोरच्या पारावर राघबा बसून राहिला...
राघबा वsssss...
आवो रंगा हुडकतोय तुमाला ,, डुट्टी लागलिया,, जानार म्हनतोय...जावा घरला ...
बाबल्याच्या निरोपा मागोमाग राघबा घराकडं चालला..
रंगा,,,काय रं??निगालास व्हय??
हां... जायला लागतंय...ड्युटी लागलीय बंदोबस्ताची... ती बी,,,तुझ्या पंढरी जवळच..
आरं , काय किरपा म्हनायची,,, पांडुरंगाने च बोलावलं रं तुला..आरं तुझ्या आज्याच्या आज्यापासून ह्या घरात वारी,, कधी चुकली न्हाय बघ...आन ह्यावर्षी हे असं...
माझी आसच मिटली म्हनायची,,, तू इतक्या जवळ जातूयास,, पांडुरंग तुला भेटनार,, तु परत येशीला,, तवा तुजच पाय धरीन...तवाच माऊली भेटंल... हि बी त्याचीच किरपा!!!!
,,, रंगा कातावला....विठ्ठल ,विठ्ठल विठ्ठल... बा!!!!मला नगं कवतीक सांगू ,, तुझ्या देवाचं... आनि,,हे बग,, मी तिथे जानारी पावलं अडवायला चाललोय...माझा काय दावा न्हाय कुनाशी.. पर आता ह्ये काम हाय माजं....आनि तेच हिताचं बी हाय ह्या साली...
आनि आजवर दिलंय काय रं तुला,, तुझ्या विठ्ठलानं??? जिमिनीचा छोटासा तुकडा,, तो बी निसर्गाचं दान माग पुढं होईल त्यावर कसला जानारा...आजा वेव्हारात फसला,, राहतं मोटं घर गेलं ... तू हा असा,,,नावापुरता संसार करून देव देव करत बसनारा..बास झालं कवतिक!!!! आक्का,, ठिगळं लावता लावता थकली..लै आबदा झाली..काय केलं तुझ्या पांडुरंगानं??आरं आक्का गेल्यावर बी मला... तसंच ....आत्येजवळ टाकून तू,,, गेलास त्याच्याचकडं... लै बघितलंय.... नगं बोलाय लाऊ..
माझ्या पायांनी तुझ्या देवाला भेटायच सपान नग ठेऊ.
वेळापूर ला हजर व्हायचंय,, तिथंच सोय केलीया राहायची..ड्युटी सम्पली की यीन.. येतो आता मी...
श्रीरंग,, ताडताड पावलं टाकत घराबाहेर पडला..राघबा निमूट बघत राहिला.....
पोरा,, बोलन्या सारखं तर लै हाय रं.. पन अस बोलून दाखवन्यापरिस तुला कळंल तवा खरं..
राघबाला, बुवांचं कीर्तन आठवलं..."न करी तळमळ, राहें रे निश्चळ,, आहे हा कृपाळ स्वामी माझा"
वर बघत राघबानं हात जोडले.
........श्रीरंग वेळापूरच्या पोलीस स्टेशन मध्ये हजर झाला आणि पुढच्या सूचनेनुसार बंदोबस्तावर हजर झाला..
चेक पोस्ट वर किरकोळ चेकिंग वगळता फार काही होत नव्हतं...
आता बर्यापैकी अंधार होता,, दुरून तीन चार दुचाकी येताना दिसल्या...चेक पोस्ट च्या अलीकडेच थांबल्या, चौघ-पाचजण हातात फिल्टर,, ग्लास घेऊन उतरले...
रंगा सामोरा आला...
काय हवंय??कुटंं जायचंय??त्याने विचारलं...
माऊली,, ह्यावर्षी कुटं जायचं न्हाय बगा,,, आम्ही दिंडी समितीची लोकं हाय.. ओळखपत्र दाखवत ते म्हणाले...च्या आनलाय ...घेता का सायेब???
दर साली बगा,, आमी वारकऱ्यांसाठी सोय करतो...देवाचं काम त्ये,,, तेवढंच पुण्य !!!!
ह्यावर्षी ती सेवा नाय तर नाय पन,, तुमचं काम भी लै मोठं हाय,, आन् आस बगा,, पांडुरंग कोनत्या बी रुपात भेटतो म्हनतात... ह्या येळी तुमच्या रुपात.. घ्या,, च्या घ्या...बंदोबस्तावरच्या सगळ्यांना चहा देऊन,, ती मंडळी निघून गेली..
रंगांच्या मनात का कोणास ठाऊक चलबिचल झाली...इतका भाव??कसा असतो??का असतो??
एकादशी दोन दिवसांवर येऊन ठेपली होती...आणि आता मात्र बंदोबस्तावर असलेल्यांवर ताण येत होता..कधी अडवणं.. कधी कडक बडगा दाखवणं, काटेकोर तपासणी ह्यात सगळ्यात उसंत नव्हती...
त्यातल्याच मध्ये मिळालेल्या थोड्या वेळात,, श्रीरंग खुर्चीवर बसला....
त्याला रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला असलेल्या झाडाच्या आडून कोणी तरी सतत बघत असल्याचं जाणवलं..
त्याने किंचित कडक खाक्यात,, खूण करून बोलावलं...
"काय हवंय??
जी ,,,काही नकोय जी.. मी पांडू.... मी निसतं बगत व्हतो,, की बाबा आलाय का??औंदा वारी जानार न्हाई,, हे खरं हाय,, पन् कसं का करून त्यो ह्या रस्त्यापातूर जर आला तर भेटला न्हाय अस व्हाया नगं म्हनून!!!
बाबा??
कोन बाबा,,कुनाचा??कुटलं गाव?? रंगाने विचारलं...
तसा माजा कोन न्हाय...पर वारीत दरवर्षी हितं च भेटतो त्यो मला... वारकऱ्यांसाठी सेवा असते आमची हितं ,, बारा वर्षं येतोय ,, मी पाय चेपून देतो जी!!! माझं पैलच वर्ष हुतं,, यायचं....आनि मी त्याला बगितलं,, संपूर्न वारी त्यानं, लोटांगण घालत घालत केली .. म्हनला माझ्या पोराच्या पायातलं बळ गेलंया,,, त्याची माय गेली,, आन् ह्यो हबाकला...लै गमावून झालंय आता ह्ये नगं... म्हनून त्या देवाला साकडं घातलया...आता ह्ये दान त्यानं मला द्येयलाच हवं,, न्हायतर,, जन्माचं भांडण मंग माजं आन् त्याचं...
काय सांगू सायेब,, मला त्याच्यात माझा बा दिसला जनु..त्याच्या पायाला हात लावला तर मला म्हनला,, ही सेवा मी घेनार न्हाय पोरा.आता माझे कष्टच त्या विठुरायाच्या चरणी रुजू....
ते साल हाय आन् हे साल हाय कदी आमची भेट चुकली न्हाय...त्यो परत येताना त्याच्याच पाया पडून मला माऊली बी भेटतीया आनि "बा" बी... जन्माची मिळकत असाय लागती सायेब तवा अशी मानसं भेटत्यात....देवाशी हक्कानं भांडाया भक्तीची दौलत बी तितकीच लागतीया...
खरं तर ...नाव विचारायची गरज नव्हतीच..तरी रंगाने विचारलं,, नाव काय त्या तुझ्या "बा"चं??
त्याचं नाव?? न्हाई जी,, मी तर बाबा च म्हनतो,, आवो जीवाची ओळख ,, वळखायला नाव कश्याला लागतंय..
तो वळुन जायला लागला....आणि जाता जाता हसून म्हणला,, त्या मुलांचं नाव लै जवळीकीच वाटलं.. बगा...बाबा म्हनायचा ,, तो .... श्रीरंग...माझा रंगा....
रंगांच्या मनात आता एकच कालवाकालव झाली... आता पंढरपुराकडे जाणाऱ्या रस्त्याकडे तोंड करून तो उभा राहिला...
देवा ,,, वैद्यकीय उपचार की तुझी कृपा,, हे मला म्हाईत न्हाई.. पन आज हे नक्की समजलं ,, की माझा बा माझ्या साठी पांडुरंग हाय,, आन् तू त्याच्यासाठी त्याची माऊली...त्याचं तुझ्या साठीचं येड आज समजतंय...
बंदोबस्तानंतर,,, आता त्याला ओढ लागली होती,,, राघबाला भेटायची....आणि त्याने अनुभवलेला विठ्ठल सांगण्याची...
कळस दिसल्यावर,, वारकरी धावत जातात तीच ओढ
आता,, रंगाच्या मनात होती....
इकडे राघबाला...वाऱ्याबरोबर पताका हलल्याचा भास झाला..डोळ्यात चमक आणि चेहऱ्यावर आनंद ...
पोरा... काय नि कसं सांगू....???वारी काय देते हे विचारून कळत न्हाई आनि सांगून समजत न्हाई...त्याचं येड लागल्याशिवाय कळत न्हाई..आनि लागलं की सुटत न्हाई...त्यानं काय दिलं काय केलं, काय नेलं ह्याचा हिशेब कसा करायचा....???सारी वेवस्था त्याचीच रं...
आपापलं काम करत राह्याचंच...पन् जीवाला जो ठाव लागतो तो विठ्ठल आहे...
धरावा विश्वास विठ्ठल चरणी।तोचि त्रिभुवनी धन्य होय।
राघबाला आता खात्री होती...त्याचा रंगा परत येईल,, तेंव्हा त्याच्या पाऊली,,, त्या सावळ्याशी गळाभेट च होईल ,,,कारण त्याचा श्रीरंगाने हृदयात विठ्ठल,, आणि मनात विश्वासाचा रंग आणला असेल...
, ह्यो घरातला अखंड वारीचा अबीर असाच राहू दे पांडुरंगा.. समाधानानं पुटपुटत...राघबानं भरून आलेले डोळे पुसले.
आरती जोशी-ऋचा प्रभुणे

Comments
Post a Comment