एका भेटीची गोष्ट....♥
तिचा उत्साह आज वेगळाच होता,,, माहेरी आलेली असूनही विचार सगळे त्याचेच..
त्याला हे आवडतं,,, हा रंग, हे कानातलं,, घट्टशी वेणी आवडायची नाही त्याला,, आज नकोच,,, होऊ दे केसांची झुळुकदार वळणं,, मनासारखी,,,
कित्ती तयारी ,लगबग,,, अगदी पहिल्यांदा भेटायचं असल्यासारखी,,,नकळत येणारं हसू, गमतीची लपवाछपवी,,,अगदी कोणालाच कळू नये म्हणून किती तो आटापिटा,,, थोडीशी सहजता होती ,, जाणीवपूर्वक तिने ती डोकावू सुद्धा दिली नाही,, ओळखीचं काहीच नकोय हं आज,, सगळं नवीन,,,,परत एकदा...??? परत एकदा हेही नको म्हणायला...
तिकडे ,,त्या घरी,,,,तोही तयारीत,, बेमालूमपणे" सिक्रेट" पोटात ठेऊन वावरत होता,,, त्यालाही त्यांची गम्मत अशी च कळू द्यायची नव्हती,,, कोणालाच
अगदी ठरवून न केलेले फोन,, आदल्या दिवशी झालेल्या बोलण्यावर बरोब्बर ठरलेल्या ठिकाणी भेटले,,, दोघंही हसले,, आधीसारखेच का??😊जायचं??तिने विचारलं...
जायचंच,,, चल 👫..
तोच रस्ता, परत नवीन होऊन त्यांच्यासाठी वळण घेत पुढे जात होता,, आणि त्यांच्या मनात पुढे जाताना आठवणींचा प्रवास मात्र उलट होत होता,,,,
ए हे बघ,,, ते पहिल फुल,, इथेच चढून काढलं होतंस ना??नाही ग इथे नाही ,पुढे.. दाखवतो थांब तुला,,,, इथे आठवतय तू कसा घसरला होतास एकदम,, ???आणि ह्या इथेच ना भांडण झाल्यावर कित्ती रुसले मी,,, इथला आपला फोटो आठवतोय,, मस्त इंद्रधनुष्य दिसलं होत तेंव्हाचा...पहिल्यांदा गजरा पण इथेच दिला होतास,, तुझ्या नोकरीची बातमी पण ह्याच कट्टयावर बसून सांगितली होतीस,, आणि त्याआधीची अस्वस्थता ही,, इथेच ,,,,अगदी सगळं ठरल्यावर पण इथेच आलो होतो ना,,, आठवतंय तुला???
ती बोलत होती,,तो बघत होता,,,
तुला माहितीय???तू अज्जिबात बदलली नाहीयेस ,, कित्ती कडू -गोड,चांगल्या- वाईट वेगवेगळ्या गोष्टी होऊन गेल्या आहेत ह्या वर्षांमध्यें,, तू कधी प्रेमाचे रंग फिके होऊ नाही दिलेस,,,आणि आज तर अजून गडद करतेयस तू ,,
तेच ठिकाण,तोच रस्ता, तीच वळणं सगळ तेच होतं,,,
लग्नाची तपपूर्ती होऊ घातलेली असतानाही, परत एकदा हे त्यांचं हळूच,,,कोणालाच न सांगता ,, चोरून भेटणं ,, बरंच काही देऊन गेलं,,, ते शोधत होते अस काही,, जे फकत दोघांचंच होतं असं काही ,,, जे रोजच्या व्यवहारात सांगायचं ,, राहून जात होतं अस काही,,,
तू आहेस तशीच अवखळ रहा,, तीच आपल्या संसारातली गम्मत आहे,अश्या आठवणी फकत तूच तयार करू शकतेस,,,ती फकत हसली,,,आणि म्हणली,, ए चल लवकर मला घरी जायला हवं वाट बघतात बरं का😊...
तोही विचारायला विसरला नाही परत कधी भेटूया,, ??? असच भेटूया परत कधीतरी संसारातून वेळ मिळाला की ,, खोडकर हसत ती उठली,,
एक अगदी वेगळी आठवण घेऊन,,,घरात पाऊल टाकताच,, लेकीबाईंनी ठसक्यात विचारलेल्या,,
"आई,किती उशीर केलास,?? लगेच येते म्हणलीस आणि ...??कुठे गेली होतीस ??मी, आजी -आबा वाट बघतोय ना,,,"
ह्या प्रश्नाने, त्यांच्या लग्नानंतरही परत एकदा लपून भेटण्याच्या कल्पनेची सांगता झाली होती...उत्तर आजही देणं अवघड झालंच होत तिला ,,पण,, ज्यासाठी हे केलं ते तर झालं होतं,
जुने ते एकमेकांना मिळाले होते,,,एरवी अबोल असणारा तो कित्ती दिवसांनी आज आधीसारखं मनमोकळं बोलला,,,,😇
ती मात्र अगदी तश्शीच होती, फकत अवखळ पैंजणांची जागा संयत ,जोडव्या -मासोळ्यांनी घेतली होती...
आरती जोशी-ऋचा प्रभुणे

Comments
Post a Comment