#AD_सहजच मनातलं
समीकरण(÷+×-)=????
आई मला नाही ग जमणार!!!तुझं सगळं आयुष्य साधं फिक्कट जगण्यात आणि 'मॅनेज'करण्यात गेलं,,, मला नकोय तसं,, भरपूर पैसा, उच्च राहणीमान ,, कसलीही चिंता नाही हेच माझ्या आयुष्याचं समीकरण आहे...आणि त्यासाठी ही भरपूर पगाराची नोकरी....हीच त्याची एकमेव बाजू आहे...
बाळा, नोकरी जरूर कर... घेतलेल्या शिक्षणाचा, बुद्धीचा वापर जरूर व्हावा ,स्त्रीला आर्थिक स्वातंत्र्य जरूर असावं,,पण त्यासाठी आयुष्यात किती गोष्टींशी तडजोड??घरातल्या अन्नाचा समाधानी घास नाही की गरज असताना मुलांना आईचा सहवास नाही.. सतत कामाचा ताण घेऊन तुझं वावरणं,,स्वस्थ बसणं सोड..शांत तरी असतेस का तू आतून??
आणि गरजा , राहणीमान ही समीकरणाची डावी बाजू तुझा अमाप पैसा तरी संतुलित करतोय का,,, ??ती बाजू फुगतच चाललीय..पैश्याचा ओघही त्याचा पाठलाग करतोय..आणि संकोच फकत तुझा होतोय...ओढाताण तुझी होतेय, आणि फरफट पर्यायाने सर्वांचीच... हे 'मॅनेज' करणं नाहीये???सुदैवाने नवरा सर्वतोपरी मदत करणारा, आणि समजून घेणारा आहे..कुठं आणि कधी थोडं थांबायचं तू ठरव..
मी केलं मॅनेज तुझ्या म्हणण्यानुसार,,, मनाला घातली पण थोडी मुरड...पण निदान येणारे पैसे आणि असणाऱ्या गरजा ,, ह्याचं समीकरण थोडी कमी चैन करून जुळलं तरी होत माझंं...आयुष्यात समाधान, उत्तम आरोग्य,आणि भरभक्कम माणसांचा जमवलेला गोतावळा,, ह्याचं ही गणित बरोब्बर जमलं बाई...
आता तुझं हे गणित,, माझ्या समजण्याच्या बाहेरचं आहे,, तुझ्या ह्या समीकरणाच्या दोन बाजू समान करण्यासाठी,, किती??कधी???कश्यासाठी???का??? हे जे 'मानायचे' क्ष आणि य घटक आहेत ना,,, ते मात्र योग्य ते निवड ...तरच हे समीकरण
संतुलित होईल आणि गणित सोडवल्याचा आनंद ही मिळेल...बघ विचार करून...!!!
पाठमोऱ्या जाणाऱ्या आईकडे माया बघत राहिली,,, नक्की येईल का ग माझं उत्तर कधी बरोबर...??? इतकंच पुटपुटली.
आरती जोशी-ऋचा प्रभुणे.

Comments
Post a Comment